शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:38 IST

नांदगाव पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयासह व्यापार बंद ठेवल्यामुळे सन्नाटा होता. या घटनेच्या अनुषंगाने बजरंग दल व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी चर्चा केली.

ठळक मुद्देनांदगाव पेठ : बजरंग दल, हेल्पलाईन पदाधिकारी सीपींच्या भेटीला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयासह व्यापार बंद ठेवल्यामुळे सन्नाटा होता. या घटनेच्या अनुषंगाने बजरंग दल व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी चर्चा केली.विशीष्ट समुदयातील वारंवार गुन्हे करणाऱ्या काही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाने केली. तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनचे प्रभाकरराव वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणासाठी मदत करण्यासाठी पुढाकार दर्शविला आहे. बजरंग दलाचे संतोष गहरवार, शिवराजसिंह राठोड, अनिल हिवे आदी उपस्थित होते.मदतीसाठी हेल्पलाईन पोहोचली सीपींकडेहनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईन शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नात असते. नांदगाव पेठ येथील जातीय तणाव पाहता हेल्पलाईनचे प्रमुख तथा ह.व्या.प्र. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्यासह संजय तिरथकर व मुस्लीम समुदयातील नागरिकांनी सीपींची भेट घेतली. नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले मत पोलीस आयुक्तांसमोर मांडले.धार्मिक स्थळावर गोटमारनांदगाव पेठेतील एका धार्मिक स्थळावर गोटमार झाल्याच्या माहितीने पोलिसांची मंगळवारी दुपारी भंबेरी उडाली. पोलिसांचा ताफा तत्काळ नांदगाव पेठेत पोहोचला. मात्र, ही अफवा असल्याचे निदर्शनास आले. नांदगाव पेठेत तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र होते. दरम्यान या अफवेमुळे परिसरातील बाजारपेठ व शाळा बंद ठेवण्यात आली. तीन आरोपींना बुधवारपर्यंत पीसीआर व अन्य आरोपींची जेलमध्ये रवाना झाली.