शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

राणा, देशमुखांची कामे न घेण्याची रणनीती

By admin | Updated: August 10, 2015 00:03 IST

महापालिकेला प्राप्त झालेल्या १३ वा वित्त आयोग व विशेष अनुदानाच्या रक्कमेतून आ. रवी राणा व आ.सुनील देशमुख यांनी ...

अनुदान वाटपाचा मुद्दा : नगरसेवकांची सोमवारी बैठकअमरावती : महापालिकेला प्राप्त झालेल्या १३ वा वित्त आयोग व विशेष अनुदानाच्या रक्कमेतून आ. रवी राणा व आ.सुनील देशमुख यांनी सुचवलेली मोठी विकासकामे कदापिही न घेण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. मात्र, प्रभागात आवश्यक असलेली मोठी कामे नगरसेवकच ठरवतील. त्याच कामांची यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची रणनीती सोमवारी होऊ घातलेल्या बैठकीत आखली जाणार आहे. परिणामी अनुदान वाटपावरून आमदार विरूध्द नगरसेवक, असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.मुंबई येथे नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मागील आठवड्यात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत आ. रवी राणा, आ. सुनील देशमुख यांनी १३ व्या वित्त आयोगातील प्रत्येकी २५ लाख रूपये अनुदान विकासकामांसाठी नगरसेवकांना वाटप करण्याच्या महापालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. केंद्र शासनाने १३ व्या वित्त आयोगाचे अनुदान मूलभूत सोयी-सुविधांच्या मोठ्या विकासकामांवर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, नगरसेवकांनी हा निधी गल्लीबोळात वापरण्याचा घेतलेल्या एकतर्फी निर्णयावर आ. राणा, आ.देशमुख यांनी प्रचंड नाराजी दर्शवली. तसेच शहरातील मोठी विकासकामे घेण्याची मागणी त्यांनी नगरविकास विभागाच्या सचिव म्हैसकर यांच्याकडे रेटून धरली आहे.त्यानुषंगाने जुलै महिन्यात पार पडलेल्या महापालिकेच्या आमसभेत प्रत्येकी २५ लाख रुपये अनुदान वाटपाचा घेतलेला ठराव शासनाकडे विखंडणासाठी पाठविण्याचे निर्देश म्हैसकर यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिले आहेत. नगरसेवकांनी घेतलेल्या अनुदान वाटपाच्या निर्णयावर या आमदारांनी आडकाठी आणण्याची खेळी चालविल्याने ही बाब सदस्यांच्या जिव्हारी लागली आहे. सोमवार १० आॅगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांनी सर्वच नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. यात अनुदानातून मोठी विकासकामे घेण्यासंदर्भात विचारमंथन केले जाणार आहे. १३ वा वित्त आयोगाच्या अनुदानातून निकषानुसार प्रभागात मोठी विकासकामे घेण्याची तयारी सुरु आहे. विकासकामे निकषानुसारच घेताना कोणत्याही नगरसेवकावर निधी वाटपात अन्याय होणार नाही, ही जबाबदारी काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांच्या शिरावर येण्याची दाट शक्यता आहे. अनुदानातून घेण्यात येणारी मोठी विकासकामे घेताना ती नगरसेवकांनी सुचविलेली असणे आवश्यक असल्याने महापालिकेतील पदाधिकारी या अनुषंगाने पुढील राजकीय खेळीच्या तयारीला लागले आहेत. १३ वा वित्त आयोग व विशेष अनुदानातून निकषानुसार घ्यावयाची विकासकामे महापालिका सभागृहात मंजूर करुन ती शासन निर्णयासाठी पाठविणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेतील सत्तापक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची बैठक बोलवल्याची माहिती आहे. काहीही झाले तरी प्राप्त अनुदानातून आमदारांची विकासकामे घ्यायची नाहीत, या निर्णयाप्रत पदाधिकारी पोहोचले आहेत. नगरसेवक सूचवतील त्याच विकासकामांना मंजुरी देऊन ही यादी शासनाकडे पाठविली जाणार आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार विकासकामांची यादी शासनाकडे पाठविली गेली तर आमदार विरुद्ध नगरसेवक, असा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट आहे. महापालिकेला १३ व्या वित्त आयोग अनुदान १९ कोटी, विशेष अनुदान २.४५ कोटी तर १४ वे वित्त आयोगाचे १८ कोटी अनुदान प्राप्त झाले आहे.