वादळी पावसाने पानपिपरी उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:02+5:30

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव तालुक्यामध्ये ६०-७० वर्षांपासून या भागातील शेतकरी हे पान पिपरी या वनौषधी पिकाची लागवड करत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पिकाची लागवड केली जाते. एक एकर पानपिपरीसाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो. सध्या स्थितीत या पिकाला फळ धारणा सुरू झाली आहे.

Storm rains destroyed Panpipri | वादळी पावसाने पानपिपरी उध्वस्त

वादळी पावसाने पानपिपरी उध्वस्त

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : कोरोनाच्या सावटात अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तीन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पानपिपरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. नायब तहसीलदार व तालुका कृषि अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी मनोहर मुरकुटे, मनोहर भावे, संजय नाठे, गोपाळ गुजर, संजय टिपरे, रामभाऊ बोडखे, विनोद थोरात, दिगंबर भोंडे, अरुण पाटील, अक्षय टिंगणे, दिवाकर येउल, नंदकिशोर नेरकर, गजेंद्र येउल आदी उपस्थित होते.
रविवारी संध्याकाळी पाच वाजताचे दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील खोडगाव, देवगाव, शेलगाव, पांढरी, दहिगाव रेचा या भागातील पान पिपरी या वन औषधी पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या मुळे याभागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव तालुक्यामध्ये ६०-७० वर्षांपासून या भागातील शेतकरी हे पान पिपरी या वनौषधी पिकाची लागवड करत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पिकाची लागवड केली जाते. एक एकर पानपिपरीसाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो. सध्या स्थितीत या पिकाला फळ धारणा सुरू झाली आहे.
पुढील दोन महिन्यात हे पीक तोडणीला येते. परंतु रविवारी झालेल्या अचानक वादळी वाऱ्याच्या पावसाने पानपिपरी पिक जमीनदोस्त झाले. त्
यामुळे फायदा तर सोडा, मात्र उत्पादनखर्च निघतो, की नाही, अशी शंका वजा भीती व्यक्त होत आहे.तालुक्यातील दहीगावरेचा, भंडारस आदी भागांमधे पानपिपरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. ते शेतकरी आस्मानी संकटाने हवलदील झाले आहेत.

Web Title: Storm rains destroyed Panpipri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.