अमरावती : पोहरा- मालखेड या विर्स्तीण जंगलात अभयारण्य निर्माण करण्याचा दिशेने शासनाने पाऊल उचलले असतानाच स्थानिक गावकरांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे प्रस्तावित अभयारण्याचा निर्णय घोषित करण्याच्या टप्प्यात असताना यात आडकाठी आली आहे. प्रस्तावित अभयारण्यात २३ गावांचा समावेश असल्याची माहिती आहे.वडाळी आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रात जंगलात वाघ वगळता अन्य वन्यप्राणी आहे. त्यांचे संगोपन, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून १० वर्षांपुर्वी मालखेड- पोहरा अभयारण्य निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. अभयारण्य निर्माण झाल्यास केंद्र शासनाच्या विविध योजनांचा गावकरांना लाभ मिळेल, या अनुषंगाने २३ गावे कायम ठेवत अभयारण्य निर्माण करण्यासाठी गावकरी, ग्रामपंचायतची मते जाणून घेतल्या गेली. १६ हजार व्यक्तींची अभयारण्य निर्मितीसाठी मते जाणून घेताना ९ ते १० हजार नागरिकांनी अभयारण्य नकोच ही भूमिका घेतली. सर्वेक्षणाअंती गावकऱ्यांच्या हरकती शासनाला कळविल्या असता राज्याचे प्रधान वनसचिवांनी अभयारण्य निर्मितीबाबत गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती, संशयकल्लोळ, गैरसमज दूर करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अभयारण्यामुळे पर्यारवणास चालना मिळण्यासह विकासाची दारे खुलतील, अशी गावकऱ्यांची समजूत घालून मते परिवर्तीत करण्याचा सल्ला वनविभागाला देण्यात आला. नागरिकांची हरकत असल्याशिवाय अभयारण्य निर्माण शक्य नाही, असे वनसचिवांनी स्पष्ट केले आहे. मागील १० वर्षांपुर्वी झालेल्या सर्वेक्षणाला मूर्त रुप देण्याची वेळ आली असता गावकऱ्यांच्या हरकतींनी अभयारण्याच्या निर्मितीत बाधा टाकल्याचे बोलले जात आहे. शहरालगतच्या भागात खासगी व्यक्तींनी जमिनी मालमत्ता म्हणून घेवून ठेवल्या आहेत. अभयारण्य झाल्यास या जमिनी अभयारण्यात जातील, या भितीने अनेक जमिन मालकांनी सुद्धा अभयारण्य होऊ नये, यासाठी गावकऱ्यांना चुकीची माहिती पसरविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली असल्याचे दिसून येते. खरे तर अभयारण्य निर्माण झाल्यास गावकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा फायदा मिळेल. मात्र, अभयारण्याबाबत गावकऱ्यांमध्ये चुकीचा समज निर्माण केल्यामुळे अनेकांनी अभयारण्य निर्मितीला नकार दिला, हे खरे आहे. (प्रतिनिधी)या गावांचा होईल समावेशप्रस्तावित वडाळी- मालखेड अभयारण्य निर्माण झाल्यास २३ गावांचा समावेश होणार आहे. त्यानुसार सर्वेक्षण सुद्धा झाले असून यात पोहरा, मासोद, इंदला, बोडणा, शेवती, सावर्डी, भानखेड (मोठे), कस्तुरा, मोगरा, सावंगा, चिरोडी, कारला, चिखली, मार्डी, पिंपळखुटा, हातला, कोंडेश्वर, अंजनगाव बारी, घातखेडा, पार्डी, गोंविदपूर, भानखेडा (लहान), मालखेड, लालखेड गावांचा समावेश राहिल.मोर, बिबट्याच्या संगोपनाचे उद्दिष्टवडाळी, मालखेडच्या विर्स्तीण जंगलात मोठ्या प्रमाणात मोर, बिबट्याची संख्या आहे. एवढेच नव्हे तर निलगाय, हरिण, काळवीट, रानडुक्कर, ससे, तरसा, गवा, लांडगे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचे संगोपनाचे उद्दिष्ट पुढे करुन अभयारण्याचा प्रस्ताव आहे.काठेवाडी गुरांनी केली जमिन पडीकवडाळी वनपरिक्षेत्रात अनेकांची शेती आहे. मात्र काही वर्षांपासून या भागात मोठ्या संख्येनी काठेवाडी गुरांचा संचार असल्याने अनेकांनी शेती करण्याचा भानगडीत न पडता ती पडीक ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. वडाळी, पोहरा हा परिसर संपूर्ण जंगलाचा नसून अनेकांची शेती असल्याचे सर्वेक्षणादरम्यान स्पष्ट झाले आहे.
पोहरा अभयारण्याच्या निर्मितीत आडकाठी
By admin | Updated: March 12, 2015 00:55 IST