थुंकणे थांबवा, अन्यथा फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:01+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये आता सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चेहऱ्यावर मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

थुंकणे थांबवा, अन्यथा फौजदारी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आता कठोर अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहºयावर मास्क नसल्यास २०० रुपये, रस्ते, बाजार, रुग्णालय आदी ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्याच व्यक्तीद्वारे दुसऱ्यांदा तीच चूक केल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई होणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये आता सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चेहऱ्यावर मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्तीविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाईचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.
सदर आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करणाऱ्याअधिकारी-कर्मचाऱ्यानी या नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीचे छायाचित्र, व्हिडीओ हे मोबाइल वा इतर साधनांनी काढावा व त्यानंतर कारवाई करावी. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पोलीस विभागाची मदत घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग नसल्यास दंड अन् एफआयआर
दुकानदार, फळ-भाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर न राखणे व विक्रेत्यांनी मार्किंग न करणे) यासाठी ग्राहकाला दोनशे रुपये तर संबंधित दुकानदार, विक्रेताला दोन हजार रुपये दंडाची आकारणी पहिल्यांदा होईल व दुसºयांचा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
या कायद्यान्वये दाखल होणार गुन्हा
महापालिका, नगरपालिका, नगर परिषद व ग्रामपंचायतींद्वारे त्यांच्या क्षेत्रात तसेच कार्यालयाच्या क्षेत्रात संबंधित शासकीय विभाग कारवाई करणार आहे. या आदेशाची अवज्ञा करणाºया व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अनुसार शिक्षापात्र गुन्हा केल्याचे मानण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.