पोलिसांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:42+5:30
बडनेरा जुनिवस्तीच्या अलमास गेटजवळ संचारबंदीमुळे ‘फिक्स पॉर्इंट’ आहे. येथे रविवारी सकाळी ११ वाजता एक मिनीडोअर फिरत होता. तेव्हा पोलिसांनी चालकाला विनाकारण का फिरतो, असे म्हटले. तेव्हा मिनीडोअर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जंगले यांच्यासह पोलिसांसोबत वाद घातला.

पोलिसांवर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : ‘हम कोरोना से नही डरने, तुम हमको रास्तेपर घुमने नही देते’ असे म्हणत एका मिनीडोअर चालकाने रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. काही वेळातच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने कुणालाही ईजा झाली नाही. या घटनेनंतर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. यात चौघांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
बडनेरा जुनिवस्तीच्या अलमास गेटजवळ संचारबंदीमुळे ‘फिक्स पॉर्इंट’ आहे. येथे रविवारी सकाळी ११ वाजता एक मिनीडोअर फिरत होता. तेव्हा पोलिसांनी चालकाला विनाकारण का फिरतो, असे म्हटले. तेव्हा मिनीडोअर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जंगले यांच्यासह पोलिसांसोबत वाद घातला. त्यांच्या अंगावर धाव घेत त्यांना धमकी दिली. या घटनेनंतर थोड्याच वेळात ‘फिक्सपॉर्इंट’वर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पीएसआय जंगले यांच्या तक्रारीवरुन कल्लू आॅटोवाला आणि तीन साथीदारांविरूध्द भादंविच्या ३५३, २६९, २७०, २७१, १८८, ५०४, ५०६ (३४) यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी आदी पोहचले. शांततेचे आवाहन पोलिसांनी केले.
अतिरिक्त फोर्स तैनात, रूट मार्च काढला
बडनेरा येथील अलमास गेट ते गुरांचा बाजार या दरम्यान दगडफेक, पोलिसांशी वाद, शिवीगाळ, धमकाविणे यासह सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी, यासाठी अतिरीक्त पोलीस फोर्स तैनात आहे. शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला.