परतवाड्यात शिवसैनिकांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:12+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून पुढे शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर भगवे झेंडे लावायला सुरुवात केली. हे झेंडे लावत कार्यकर्ते त्या चौकात पोहोचले तेव्हा कुठे झेंडे लावायेच, कुठे नाही, यावरून काहींनी त्या कार्यकर्त्यांसमवेत वाद घातला. याचे पर्यावसन मारहाणीत व दगडफेकीत झाले. जवळपास २० ते २५ मिनिटे हा प्रकार घडला.

परतवाड्यात शिवसैनिकांवर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील जयस्तंभ ते तिलक एजन्सी दरम्यानच्या चौकात २६ जुलैला रात्री १० वाजताच्या सुमारास शिवसेना कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली, तर काहींना मारहाण सुद्धा करण्यात आली. याप्र्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून पुढे शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर भगवे झेंडे लावायला सुरुवात केली. हे झेंडे लावत कार्यकर्ते त्या चौकात पोहोचले तेव्हा कुठे झेंडे लावायेच, कुठे नाही, यावरून काहींनी त्या कार्यकर्त्यांसमवेत वाद घातला. याचे पर्यावसन मारहाणीत व दगडफेकीत झाले. जवळपास २० ते २५ मिनिटे हा प्रकार घडला. काहींनी याबाबत परतवाडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. शहरात गस्त वाढविण्यात आली. दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडीही शहरात तैनात केली. रात्रीलाच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मिळविले. या फुटेजच्या आधारे २७ जुलैला दगडफेक व मारहाण करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला. फुटेज बघून खातरजमा, ओळखपरेड करून घेण्याकरिता परतवाडा पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सूचित केले होते. पण, कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसात मग्न असल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर कुणीही पोलीस ठाण्यात दाखल झालेले नव्हते. पोलिसांनी २६ जुलैच्या रात्रीलाच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यामुळे २७ जुलैला शहरातील जनजीवन सुरळीत राहिले.
घटनेच्या अनुषंगाने कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. दगडफेक व मारहाण करीत वातावरण गढूळ करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
- सदानंद मानकर
ठाणेदार, परतवाडा.