शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवी विसर्जनात लाठ्या काठ्या, तलवारी,अन् आगीचे टेंभे; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 12:44 IST

सदस्य व कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार लोखंडी तलवारी व दोन काठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

परतवाडा: शहरातील देवी विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आखाड्यातील तलवारी लाठ्या-काठ्या आणि आगीचे टेंभे फिरवल्यावरून, परतवाडा पोलिसांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार लोखंडी तलवारी व दोन काठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.    परतवाडा येथील मॉ बिजासन नवदुर्गा उत्सव मंडळ पेन्शनपुराचे पदाधिकारी, सदस्य, व कार्यकर्ते गुरुवारला देवीचे विसर्जनाकरिता मिरवणुकीने जात होते. दरम्यान सायंकाळी अचलपूर नगर परिषदेच्या गेट समोर सार्वजनिक ठिकाणी ते तलवारी, लाठ्या काठ्या, आगीचे टेंभे असलेली लोखंडी रिंग आणि  टेंभे जवळ बाळगून असल्याचे व फिरवताना पोलिसांना दिसून आलेत. जीवित हानी होण्याची शक्यता व जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई हुकूम विचारात घेत परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी कायदेशीर फिर्याद नोंदविली. या फिर्यादीत ठाणेदारांनी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य राम सुरेश बघेल, निखिल डायलकर, आकाश जानरावजी भुते, मुकेश उज्जैनकर, उदेश पांडे, योगेश नरेश गुप्ता व इतर कार्यकर्त्यांविरुद्ध ही फिर्याद नोंदविली आहे. २० देवींचे विसर्जन गुरुवारला परतवाडा शहरातील २० दुर्गादेवींचे विसर्जन केल्या गेले. मिरवणुकीने मोठ्या उत्साहात नियमावलीचे पालन करीत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे विसर्जन पार पाडले. ठाणेदार संतोष ताले स्वतः या दरम्यान बंदोबस्तात पेट्रोलिंगवर होते. विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात आला होता. 

टॅग्स :Navratriनवरात्रीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी