महिलेची विनापरवानगीने नसबंदी
By Admin | Updated: July 19, 2015 00:04 IST2015-07-19T00:04:55+5:302015-07-19T00:04:55+5:30
बडनेरा येथील एका महिलेची जबरीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून

महिलेची विनापरवानगीने नसबंदी
नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी
अमरावती : बडनेरा येथील एका महिलेची जबरीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टराला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकाराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, बडनेऱ्यातील झंझाडपुरा येथील रहिवासी गिता विनोद रेड्डी (३२) या महिलेला सोमवारी प्रसूतीकरिता डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महिलेची प्रसूती मध्यरात्रीदरम्यान झाली असून तेव्हा तिचे पती उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित नातेवाईकांच्या परवानगीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
- अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, डफरीन रुग्णालय.