शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

एका हातात स्टेअरिंग, दुसऱ्या हातात मोबाइल; हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:21 IST

१.३२ लाख चालकांना दंड : अनपेड चालानची रक्कम सहा कोटींवर

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : डिजिटलच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, वाहन चालवताना त्याचा वापर करणे महागात पडू शकते. तरीही, बरेच लोक गाडी चालवताना कॉल किंवा मेसेज करण्यासाठी त्याचा वापर करतात. लोक वाहन चालवताना सोशल मीडिया तपासण्यासाठीही फोन वापरतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की गाडी चालविताना मोबाइल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंडसुद्धा होऊ शकतो.

अमरावती ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या एकूण ४२८ वाहनधारकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला. मात्र, केवळ सहा जणांनी सात हजार रुपये दंड भरला. तर, ४२२ वाहनचालकांनी ४.४९ लाख रुपये दंडाकडे पाठ फिरविली. तो दंड अनपेड राहिला. 

आठ महिन्यांत ९४ लाख वसूल आठ महिन्यांत एकूण ७ कोटी ३ लाख ८४ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र, केवळ ३४ हजार ८५९ वाहनचालकांनी ९४ लाख ६ हजार २०० रुपये दंड भरला. तर, ९७ हजार ३१० वाहनचालकांनी दंडाकडे पाठ फिरविली.

मोबाइलवेड्यांना ४.५६ लाखांचा दंड ग्रामीण वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ४२८ मोबाइलवेड्या चालकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड ठोठावला. यात दुचाकीचालकांसह चारचाकीचालकही आहेत. ते मोबाइलधारक वाहनचालक अपघातांसाठी कारणीभूत ठरतात.

२३ हजार वाहनचालक सिटबेल्टविना जानेवारी ते ऑगस्टदरम्यान तब्बल २३ हजार ९०६ वाहनचालक सिटबेल्टविना आढळले. त्यांना ५१ लाख ४७ हजार रुपये दंड आकारण्यात आला. पैकी केवळ १५ हजार वाहनचालकांनी ३१ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड भरला.

"ऑगस्टअखेरपर्यंत १ लाख ३२ हजार वाहनचालकांना एकूण ७ कोटींहून अधिकचा दंड आकारण्यात आला. पैकी ९४ लाख रुपये वसूल करण्यात आले. अनपेड चालानची रक्कम ६ कोटींवर पोहोचली आहे." - सतीश पाटील, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :Amravatiअमरावती