परतवाडा बस स्थानकात प्रवाशांकरिता लागल्या स्टीलच्या खुर्च्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:41+5:302021-06-22T04:09:41+5:30

परतवाडा बस स्थानकात प्रवाशांकरिता लागल्यात स्टीलच्या खुर्च्या फोटो पी २१ परतवाडा एसटी परतवाडा : अडीच वर्षांत परतवाडा बस ...

Steel chairs for passengers at Paratwada bus stand | परतवाडा बस स्थानकात प्रवाशांकरिता लागल्या स्टीलच्या खुर्च्या

परतवाडा बस स्थानकात प्रवाशांकरिता लागल्या स्टीलच्या खुर्च्या

परतवाडा बस स्थानकात प्रवाशांकरिता लागल्यात स्टीलच्या खुर्च्या

फोटो पी २१ परतवाडा एसटी

परतवाडा : अडीच वर्षांत परतवाडा बस स्थानकात उघड्यावर असलेल्या प्रवाशांना बसण्याकरिता आता चक्क स्टीलच्या खुर्च्या लावण्यात आल्या आहेत.

परतवाडा आगारात मागील अडीच वर्षांपासून प्रवासी उघड्यावर असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकम“ने २० जूनला प्रकाशित केले होते. यात जुनी इमारत पाडून उभारल्या गेलेल्या खुल्या गोलाकार इमारतीत प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

वृत्त प्रकाशित होताच रविवारी दुपारपासून प्रवाशांना बसण्याकरिता काही भागात स्टीलच्या खुर्च्या बसविण्यात आल्या. उर्वरित भागात त्या बसविण्याचे काम सुरू आहे. अगदी एखाद्या विमानतळावर बसविल्या गेलेल्या खुर्च्यांप्रमाणे त्या बसविल्या जात आहेत. प्रवाशांनी सोमवारपासूनच त्यावर बसायला सुरुवात केली. सिमेंट बाकांऐवजी स्टीलच्या खुर्च्या बघून प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Steel chairs for passengers at Paratwada bus stand