राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम, 20 पैकी 15 पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 04:20 IST2021-01-18T04:18:15+5:302021-01-18T04:20:01+5:30
पुणे येथील पशुसंर्वधन रोग चाचणी विभागाच्या सहआयुक्तांनी २० मृत पक्ष्यांचे नमुने १२ जानेवारी रोजी भोपाळला पाठविले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात विदर्भातील पॉझिटिव्ह मृत पक्ष्यांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका टळला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे महसूल, वने आणि पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’ झाला आहे.

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम, 20 पैकी 15 पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह
गणेश वासनिक -
अमरावती: राज्य शासनाने चाचणीसाठी पाठविलेल्या मृत पक्ष्यांच्या २० नमुन्यांपैकी १५ नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानने जारी केला. परिणामी, परदेशी स्थलांतरित पक्ष्यांमुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
पुणे येथील पशुसंर्वधन रोग चाचणी विभागाच्या सहआयुक्तांनी २० मृत पक्ष्यांचे नमुने १२ जानेवारी रोजी भोपाळला पाठविले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात विदर्भातील पॉझिटिव्ह मृत पक्ष्यांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका टळला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे महसूल, वने आणि पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. मृत पक्ष्यांची शोधमोहीम राबविण्यासाठी तालुकानिहाय ‘फ्लाईंग स्कॉड’ गठित करण्यात आले आहेत. ‘बर्ड फ्लू’ विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यापासून होत नाही, अशी जनजागृती केली जात आहे.
वनाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना पत्र
वनाधिकाऱ्यांनी जंगल, व्याघ्र प्रकल्पात फिल्डवरील कार्यरत वनकर्मचाऱ्यांना जलाशय, तलावावर परदेशी अथवा स्थानिक पक्ष्यांवर लक्ष ठेवण्याबाबत सजग केले आहे. मृत पक्षी आढळल्यास त्याचे नमुने घेताना काळजी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाला अवगत करूनच घटनास्थळी पंचनामा करावा, असे उपवनसंरक्षकांनी पत्राद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षकांना कळविले आहे.
या १५ ठिकाणचे नमुने पॉझिटिव्ह -
- केंद्रवाडी, ता. आम्देपूर जि. लातूर (पोल्ट्री)
- सुकनी, ता. उदगीर जि. लातूर (पोल्ट्री)
- कुप्ता, रा. शेलू जि. परभणी (पोल्ट्री)
- पेडगाव, ता परभणी, जि. परभणी (पोल्ट्री)
- पापडवाडी (माहूर),
ता. माहूर जि. नांदेड (पोल्ट्री)
- नवंध्याची वाडी, कंधार, जि. नांदेड (पोल्ट्री)
- मुळशी (चांदे),
ता. मुळशी जि. पुणे (पोल्ट्री)
- दौंड (मौजे बेरीबे), ता. दौंड जि. पुणे (पोल्ट्री)
- मंगलवेढा, ता. मंगलवेढा जि. सोलापूर (पोल्ट्री)
- टोंडार (वंजरवाडी), ता. उदगीर जि. लातूर (पोल्ट्री)
- कांडला आर्णी, ता. आर्णी जि. यवतमाळ (मोर)
- श्रीगोंदा, जि. अहमदनगर (पोल्ट्री)
- कुर्डुवाडी, ता. औसा जि. लातूर (पोल्ट्री)
- लोखंङी शिवरगाव, ता. अंबेजोगाई जि. बीड (पोल्ट्री)
- आयपीडीबी, पेण जि. रायगड (पोल्ट्री)