शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासन करणार गरीब, गरजू कैद्यांच्या जामिनासाठी मदत; समिती गठीत

By गणेश वासनिक | Updated: October 13, 2023 17:12 IST

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कैद्यांच्या जामिनासाठी निधीची तरतूद, येत्या काळात राज्यातही होणार लागू

अमरावती : हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षेच्या रूपात भोगत असलेल्या कारागृहातील गरीब, गरजू कैद्यांच्या जामिनासाठी शासन मदत करणार आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारने समिती गठीत केली असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे. सामाजिकदृष्ट्या कैद्यांसाठी हा उपक्रम राज्यात राबविला जाणार आहे.

विदर्भातील कारागृहात कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी नोंदणीकृत संस्था असलेल्या वऱ्हाड विकास संस्थेचे धनानंद नागदिवे यांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार डॉ. अनिल बोंडे यांना निवेदनाद्वारे कैद्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी अवगत केले होते. यात राज्याच्या कारागृहात कैदी बंदीस्त आहेत, पण जामीन मंजूर होऊनही पैश्याची तरतूद नसल्याने ते जमानत घेऊ शकत नाहीत. अशा गरीब व गरजू जामीन मंजूर झालेल्या कैद्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने मदत करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार गृह विभागाचे उप सचिव विनायक चव्हाण यांनी १३ सप्टेंबर २०२३ रोजी गरीब व गरजू कैद्यांच्या जामीनाची समस्या सोडविण्यासाठी यावर्षी राज्य सरकारने सहा सदस्यीय समिती देखरेख गठीत केल्याबाबतचे शासनादेश निर्गमित केले आहे.

सहा सदस्यीय देखरेख समितीचे गठणराज्य शासनाने गरीब व गरजू कैद्यांच्या जामीनाची समस्या सोडविण्यासाठी गृह विभागाचे अवर सचिव/ प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत सहा सदस्यीय देखरेख समितीचे गठण करण्यात आले आहे. यात सदस्य सचिवपदी कारागृह प्रशासनाचे अपर पोलिस महासंचालक तर सदस्य म्हणून विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आणि गृह विभागाच्या उप सचिवांचा समावेश आहे.

दंड भरण्यास असमर्थ असलेल्या तसेच आर्थिक अडचणीमुळे जामीन मिळू शकत नसलेल्या बंद्यांना जामीन मिळण्यासाठी आखलेल्या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता शासन स्तरावर देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेत कारागृहात खितपत पडलेल्या गरीब व गरजू कैद्यांना जामीन मिळण्यासाठी मदत होईल. बाहेर पडून सामाजिकदृष्ट्या चांगले जीवन जगता येणार आहे.

- धनानंद नागदिवे, सचिव, वऱ्हाड विकास संस्था.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग