विना विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा सुरू ! मोबाईलवर वाजली घंटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:42+5:302021-06-29T04:10:42+5:30
वरूड : शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी अशा अवस्थेत शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या सुरू झाला असून शाळेत वाजणारी ...

विना विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा सुरू ! मोबाईलवर वाजली घंटी !
वरूड : शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी अशा अवस्थेत शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या सुरू झाला असून शाळेत वाजणारी घंटी मोबाईलवर वाजली. शाळेचा पहिला दिवस आनंददायी वातावरणात शिक्षकांनी साजरा केला. मात्र विद्यार्थ्यांचा चिवचिवाट नसला तरी आभासी पद्धतीने शाळेची सुरुवात झाली. शहरातील शाळांत शिक्षकांनी १०० टक्के हजेरी लावून ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ केला.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता २८ जूनपासून सुरुवात झाली. १ ते ९ आणि ११ पर्यंतच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती, तर १० आणि १२ करिता १०० टक्के उपस्थितीत ऑनलाईन अभ्याक्रमाला सुरुवात करण्यात आली. ठरवून दिल्याप्रमाणे हजेरी लावून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याशिवाय शैक्षणिक सुरुवात केली. आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरूनच शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन शिक्षणाने सुरू केला. स्व. माणिकलाल गांधी जागृत विद्यालयात शिक्षकांनी हजेरी लावून वर्गातून ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले. विद्यार्थ्यांचा किलबिलाट नसला तरी शिक्षकांनी अभ्यासक्रमाला सुरुवात केली. वरूड शहरातील एनटीआर हायस्कुल, स्व. माणिकलाल गांधी जागृत विद्यालय, न्यू इंग्लिश शाळा, महात्मा फुले महाविद्यालय, जानकीदेवी कन्या विद्यालय, नगरपरिषद मराठी शाळा, पानसे विद्यालय, न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट, शांती निकेतन शाळा, स्कूल ऑफ स्कॉलर्स, उर्दू शाळा, एचकेएम उर्दू शाळा, माधवराव पानसे विद्यालय, आप्पा साहेब देशमुख विद्यालय, पीडी कन्या शाळासह आदी शाळा महाविद्यालये सुरू झाले. शिक्षकांनी शासनाच्या निकषानुसार हजेरी लावली होती.