डीपीआर सर्वेक्षणाला प्रारंभ

By Admin | Updated: December 8, 2015 00:10 IST2015-12-08T00:10:29+5:302015-12-08T00:10:29+5:30

शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे.

Start the DPR survey | डीपीआर सर्वेक्षणाला प्रारंभ

डीपीआर सर्वेक्षणाला प्रारंभ

२० वर्षांचा वेध घेणार : डिजिटायझेशन मॅपिंग, सर्वेक्षण सुरू
अमरावती : शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे. पुढील २० वर्षांचा वेध घेत नागरिकांच्या समस्या, प्रश्नांना यात प्राधान्य दिले जात असून मौजे प्रगणनेनुसार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. एकूणच शहराचे डिजिटायझेशन मॅपींग केले जाणार आहे.
नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानुसार १९९२ नंतर आता २०१५ मध्ये अमरावती शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. महापालिका हद्दीतील नागरी वस्त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात अमरावती, बडनेरा शहरासह १७ समाविष्ट खेड्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असून मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आणि डिजीटायलेझन मॅपिंगची जबाबदारी पुणे येथील मोनार्च सर्वेअर इंजिनियरिंग प्रा. लि. कडे सोपविण्यात आली आहे.
या कंपनीने मौजे शेगाव भागातून सर्वेक्षणाचे कामदेखील सुरु केले आहे. नवीन, जुन्या नागरी वस्त्यांची वस्तुस्थिती सर्वेक्षणात नमूद केली जाणार आहे. सद्याची लोकसंख्या आणि येत्या २० वर्षांनंतर शहराचे रुपडे कसे राहील, ही बाब डीपीआरमध्ये समाविष्ट केली जात आहे. एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विद्यमान जमिनीचा वापर नकाशा तयार करुन तो नगररचना विभागाच्या चमूकडून मंजूर करून घेतला जाणार आहे. शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक येथील नगर रचना विभागाची विशेष चमू अमरावतीत पाठविली आहे.
या चमुचे कामकाजही सुरु झाले आहे. मात्र, डीपीआरचे सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनचे मॅपिंगचा कालावधी प्रशासनाने मोनार्च कंपनीला १० महिने ठरवून दिला आहे. खरे तर शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी २०१२ मध्ये सर्वेक्षण करून तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते, तथापि महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईने तीन वर्षे तो उशिरा तयार केला जात आहे. डीपीआरमध्ये नागरी वस्त्या, मूलभूत व पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. (प्रतिनिधी)

२० मौजे प्रगणनेचे होणार सर्वेक्षण
अमरावती, बडनेरा शहरासह महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १७ खेड्यांचे विकास आराखडा तयार करताना २० मौजे प्रगणनेचे सर्वेक्षण होणार आहे. यात पहिला टप्पा मौजे शेगाव येथून सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आले आहे. घरांचे मोजमाप, ले-आऊट, जमिनीचा वापर, लोकसंख्येनुसार सर्वेक्षण केले जात आहे. डिजीटायलझेन मॅपिंग करुन तो डाटा जीआयएस प्रणालीशी लिंकद्वारे जोडला जाणार आहे.

या मूलभूत बाबींचा राहील समावेश
शहर विकास आराखड्यात येत्या २० वर्षांचे व्हिजन लक्ष्य ठेवून मूलभूत बाबींना स्थान दिले जात आहे. यात शाळा, महाविद्यालये, रस्ते, उद्यान, हॉस्पिटल, रुग्णालये, संकुल, क्रीडांगणे, मॉल्स, समाजमंदिर, अंगणवाडी केंद्र, बसस्थानक, चौक सौदर्र्यींकरण, वाहतूक व्यवस्था, भाजीबाजार, हॉकर्स झोन, डिपी रस्ते, ले- आऊट, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, रस्ते फुटपाथ, वाहनतळ आदी बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे.

एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विकास आराखडा तयार केला जात आहे. यात विद्यमान जमिनीचा वापर गृहीत धरुन सर्वेक्षण केले जात आहे. मौजे प्रगणनेनुसार हे सर्वेक्षण होत असून नागरी प्रश्न, मूलभूत सोईसुविधांना प्राधान्य राहील.
- सुरेंद्र कांबळे
सहसंचालक नगर रचना विभाग, महापालिका

Web Title: Start the DPR survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.