मुद्रांक विक्रेत्यांचा वाद चिघळणार
By Admin | Updated: March 11, 2016 00:34 IST2016-03-11T00:34:43+5:302016-03-11T00:34:43+5:30
मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक यांची तहसील कार्यालय परिसरातील बैठक व्यवस्था मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली...

मुद्रांक विक्रेत्यांचा वाद चिघळणार
बैठक व्यवस्था वादात : संगणकामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ
सुनील देशपांडे अचलपूर
मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक यांची तहसील कार्यालय परिसरातील बैठक व्यवस्था मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली असताना त्यांनी तेथे संगणक आणल्याने त्यांच्यात व झेरॉक्स, संगणकावर काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्यावसायिकांनी मुद्रांक विक्रेत्यांनी उभारलेल्या शेड, आणलेल्या संगणकावर हरकत घेतली आहे.
रेल्वे गेट ते परतवाडा मार्गावर गेलेले दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या खोलीतून पुन्हा अचलपूर येथील तहसील कार्यालय परिसरात लोकाग्रहास्तव गेल्या ७ ते ८ महिन्यापूर्वी आणले गेले. सदर कार्यालय ज्या खोलीत झाले तेथे अगोदर मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांची बैठक व्यवस्था होती. हे कार्यालय येथे आल्याने मुद्रांक विक्रेत्यांना दुय्यम निबंधक कार्यालयामागे तहसील कार्यालयाच्या परिसरातच चार भिंती उभारुन टिनाचे शेड टाकून बैठक व्यवस्था करून देण्यात आली. ही व्यवस्था लोकवर्गणीतून केली असल्याची माहिती आहे. पण गेल्या ५-६ दिवसांपूर्वी येथे संगणक (कॉम्प्युटर्स) आणल्याने जवळच असलेले कॉम्प्युटर व झेरॉक्सची कामे करणाऱ्या व्यावसायिकांमध्ळे असंतोष निर्माण झाला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत अचलपूर येथील तहसीलसमोरील व्यावसायिकांनी तहसीलदारांना लेखी निवेदनात म्हटले की, लोकांची कामे त्वरित व्हावी व आम्हालाही रोजगार मिळावा म्हणून आम्ही लाखो रूपये भांडवल अडकवून झेरॉक्स व संगणकांवर होणाऱ्या कामांचा व्यवसाय सुरू केला आहे. परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्तऐवज लेखक यांनी जमिनीवर अवैध बांधकाम करून शेड उभारले आहे. यामध्ये विद्युत मीटर घेऊन अवैधपणे संगणकावर कामे सुरू केली.