महामार्गावर एसटी बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 21:42 IST2019-08-17T21:42:14+5:302019-08-17T21:42:31+5:30
दोन जखमी : मोठी घटना टळली

महामार्गावर एसटी बस उलटली
तिवसा (अमरावती) : लगतच्या मोझरीनजीक हॉटेल साईकृपाजवळ नागपूर येथून अमरावतीला जाणारी एसटीबस शनिवारी रात्री ८ वाजता उलटली. यात सहा प्रवासी जखमी झाले.
नागपूरहून अमरावतीकडे जाणारी एमएच ४० वाय ५२६६ क्रमाकांची बस अचानक अनियंत्रित झाली. त्यात बस महामार्गावरून रस्त्याच्या खाली खड्ड्यात उलटली. बसमध्ये एकूण ४६ प्रवासी होते. यात चालक बाळू ठाकरे व वाहक सय्यद अन्सार हे होते.
पुंडलिक नारायण सोलंके (रा. तळेगाव शामजीपंत), मधुकर वामनराव अटाळकर (८०, आसेगाव पूर्णा) यांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार अन्य जखमींना मोझरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर, नगराध्यक्ष वैभव वानखडे, पांडुरंग मक्रमपुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.