भातकुली शहरात जंतुनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:40+5:30
शहरातील मुख्य चौकांत पोस्टर व भित्तिपत्रके रंगविण्यात आलीत. नगरपंचायतीच्या पथकाद्वारे मौखिक प्रचार सुरू आहे. मुख्य मार्गावर रंगरंगोटी व आकर्षक चित्रे काढली आहेत. बँक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत बाहेर पडणाऱ्या ग्राहकांकरिता प्रतिष्ठानांपुढे सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने मार्किंग केले आहे. शहरातील दुकानांना त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत नोटीस देण्यात आली.

भातकुली शहरात जंतुनाशकाची फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भातकुली शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूरळणी व सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशके फवारणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाबाबत नगरपंचायतमार्फत प्रसिद्धी रथाद्वारे मुनादी देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील मुख्य चौकांत पोस्टर व भित्तिपत्रके रंगविण्यात आलीत. नगरपंचायतीच्या पथकाद्वारे मौखिक प्रचार सुरू आहे. मुख्य मार्गावर रंगरंगोटी व आकर्षक चित्रे काढली आहेत. बँक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत बाहेर पडणाऱ्या ग्राहकांकरिता प्रतिष्ठानांपुढे सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने मार्किंग केले आहे. शहरातील दुकानांना त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत नोटीस देण्यात आली. होम डिलिव्हरीकरिता नगरपंचायतीने पासेस उपलब्ध केल्या आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उभारलेल्या शेल्टर होममध्ये बेघर, गरीब तसेच इतर राज्यांतून, शहरातून आलेल्या नागरिकांना निवास, भोजन तसेच आरोग्यविषयक सुविधा देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. सामाजिक संस्थानी गरीब व गरजूंना आर्थिक, धान्याची मदत करण्याचे आवाहन नगराध्यक्ष रेखा पवार, उपाध्यक्ष गिरीश कासट, आरोग्य सभापती इरफान शाह, मुख्याधिकारी करिश्मा वैद्य व नगरसेवकांनी केले. सहायक कार्यालय अधीक्षक मयूर बेहरे, सहायक लेखापाल वैशाली मोहोड, सहायक कर निरीक्षक देमगुंडे, विजय महल्ले, देवेंद्र इंगोले, संतोष केतकर, दीपक रेहपाडे, अनुराग वाटाणे, विष्णू तराळे, सुलभा रामेकर आदी परिश्रम घेत आहेत.