बडनेऱ्यातील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद

By Admin | Updated: August 2, 2014 23:50 IST2014-08-02T23:50:52+5:302014-08-02T23:50:52+5:30

विशिष्ट समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये घुसून सामानाची तोडफोड करण्याच्या अन्य समाजाच्या दादागिरीच्या विरोध दर्शविण्यासाठी शनिवार २ जुलै रोजी बडनेऱ्यातील

Spontaneous closure of businessmen in Badnerara | बडनेऱ्यातील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद

बडनेऱ्यातील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद

दोन समुदायांमध्ये तणाव : सामानाची तोडफोड, शिवीगाळीचे प्रकरण तापले
बडनेरा : विशिष्ट समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये घुसून सामानाची तोडफोड करण्याच्या अन्य समाजाच्या दादागिरीच्या विरोध दर्शविण्यासाठी शनिवार २ जुलै रोजी बडनेऱ्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे बडनेऱ्यातील बाजारपेठेत शुकशुकाट आढळून आला.
गत २८ जुलै रोजी या दोन्ही समुदायांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती. प्रकरण वाढत जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांविरूध्द किरकोळ मारहाण व शिविगाळीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेचे पडसाद १ आॅगस्ट रोजी देखील उमटले एका समुदायाने दुसऱ्या समुदायातील नागरिकांच्या प्रतिष्ठानांमध्ये घुसून सामानाची तोडफोड व जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप दुसऱ्या समाजाने केला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे देखील नोंदविले आहेत. या तोडफोडीच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणी दौलत पारूमल बजाज (४२,रा. सिंधी कॅम्प)यांच्या तक्रारीवरून चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत. हफीज खान हमीद खान (३०,मोमीनपुरा), सय्यद जावेद अली हसन अली (४०,आझादनगर), शेख सरदार शेख हुसैन (२२,मोमिनपुरा), अब्दुल अय्यार अब्दुल वहाफ (३०, रा.कुरैशीनगर बडनेरा), अशी याप्रकरणातील आरोपींची नावे आहेत. दौलत बजाज यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या सामानाची तोडफोड करण्यात आली.

Web Title: Spontaneous closure of businessmen in Badnerara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.