खासगीत कापूस @ ५१००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:31 IST2017-12-16T22:31:27+5:302017-12-16T22:31:45+5:30

यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

Specialist Cotton @ 5100 | खासगीत कापूस @ ५१००

खासगीत कापूस @ ५१००

ठळक मुद्देयंदाचा सर्वाधिक दर : रूईची दरवाढ, मागणी वाढली

आॅनलाईन लोकमत
अमरावती : यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. कापसाच्य दरात ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल, तर सोयाबीनमध्येही २०० ते ३०० रूपयांपर्यंत वाढ झालीे आहे. खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी, शर्तींचा भडीमार असल्याने शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडे अधिक दिसत आहे.
खासगी बाजारात शनिवारी कापसाची ४७०० ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीने सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट येणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात रूईचे दर वाढल्याने भाववाढ झालेली आहे.
जिल्ह्यात सध्या नाफेडची सहा, तर सीसीआयची दोन, अशा आठ केंद्रांवर आधारभूत किमतीने कापसाची खरेदी सुरू आहे.मात्र, केंद्र सुरू झाल्यापासूनच खासगीत कापसाला अधिक दर असल्याने केंद्र ओस पडली आहेत. या सर्व केंद्रांवर गेल्या दोन महिण्यात केवळ २ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत व्यापाºयांनी सध्यास्थितीत एक लाख ३० हजारांवर क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीन २४०० ते २९०० रूपये प्रति क्विंटल विकल्या गेले, वास्तविकता २०० रूपये बोनससह सोयाबीनची अधारभूत किंमत ३०५० रूपये आहे. मात्र, जिल्ह्यातील १० नाफेड केंद्रांवर नॉन एफएक्यू सोयाबीन नाकरल्या जात आहे. आता आर्द्रता नसल्यामुळे स्थानिक बाजारात व्यापाºयांनीदेखील दरवाढ केली. यामागे अनेक कारणे असली तरी खासगी खरेदीत प्रथमच दरवाढ झालेली आहे. यंदा मळणीच्या हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन डागी झाले. नॉन एफएक्यू प्रतवारी असल्याने नाफेडच्या केंद्रांवर नाकारले जात असल्याने व्यापाºयांनीही बेभाव खरेदी केली. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली व्याºयांनी सांगितले.

डीओसी, रूईचे आंतरराष्ट्रीय दरात वाढ
यंदा कापसाचे उत्पादनात ४० टक्क्यांनी कमी येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ३.५६ ची गाठ सध्या ४ हजार रूपयांपर्यंत मागणी आहे. यामुळे कापसाची दरवाढ झाली. सोयाबीनमध्ये सद्यस्थितीत आर्द्रता नाही व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली. मात्र, पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदे कमी होणार असल्याने किमान आठ ते दहा दिवस १०० ते १५० रूपयांनी भाव कमी होऊ शकतात, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

सध्या स्थानिक बाजारात हरभरा, तुरीला उठाव नाही. सोयाबीनची आर्द्रता कमी झालेली आहे व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनची दरवाढ झाली. कपाशीचे उत्पादनात कमी येत आहे व रूईची दरवाढ झाल्याने कापसातही तेजी आली.
- अमर बांबल, अडते, व्यापारी
 

Web Title: Specialist Cotton @ 5100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.