शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी कैद्यांवर नियंत्रण ठेवणार - विशेष पोलिस महानिरीक्षक

By गणेश वासनिक | Updated: July 7, 2023 17:50 IST

कारागृहात ६३७ विदेशी बंदीसंख्या, ई -प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लागू

अमरावती : राज्याच्या कारागृहात विदेशी कैद्यांना ई- प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंग करता यावे, यासाठी या संपूर्ण यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी पुणे येथील कारागृह मुख्यालयातील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे विशेषत्वाने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजमितीला ६३७ विदेशी बंदीसंख्या असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याकरिता ई-प्रिझम प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ही सुविधा अद्यापही विदेशी बंद्यांना देण्यात येत नव्हती. विदेशी बंद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून ई-प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंग सुविधा पुरवून मानवी हक्कांचे सरंक्षण करणे गरजेचे आहे, असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढून कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी ४ जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून ही सुविधा लागू केली. तथापि, पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना ही सुविधा राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना निर्देश दिले आहेत.मध्यवर्ती कारागृहांमध्ये ६३७ विदेशी कैदी

राज्यातील विविध कारागृहांत आजमितीला ६३७ बंदी दाखल आहेत. विशेषतः मुंबई, नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात विशेषतः नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ आदी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल झाले आहेत.कारागृहातून गर्दी कमी होण्यास मदत होईल

ही सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल. कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंद्यांची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ही सुविधा परिणामकारकपणे यशस्वितेची जबाबदारी पुणे येथील कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPrisonतुरुंगjailतुरुंग