एसपी अभिनाश कुमार रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:05 IST2017-05-09T00:05:05+5:302017-05-09T00:05:05+5:30
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी अभिनाश कुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.

एसपी अभिनाश कुमार रुजू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी अभिनाश कुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील गुन्हेगारांसंदर्भात अभ्यास करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास बांधिल असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अभिनाश कुमार यांची नियुक्ती झाली. अभिनाश कुमार हे सन २००७ च्या रॅन्कचे आयपीएस अधिकारी असून ते सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यात प्रोव्हीबीशनवर होते. त्यानंतर वर्धा येथे अपर पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळली. तेथून त्यांनी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक पद भूषविले. त्यानंतर पुन्हा वर्धा येथे पदोन्नती होऊन त्यांनी पोलीस अधीक्षकपद सांभाळले. त्यानंतर नागपूर येथे पोलीस उपायुक्तपद सांभाळल्यानंतर आता त्यांची बदली अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली.