धामणगाव तालुक्यातील सोयाबीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:27+5:30

धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली.

Soybean under water in Dhamangaon taluka | धामणगाव तालुक्यातील सोयाबीन पाण्याखाली

धामणगाव तालुक्यातील सोयाबीन पाण्याखाली

ठळक मुद्देसंकट : प्रथम खोडकिडी आता कोंब, सलग पाचव्या दिवशी पाऊस

मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : प्रथम अल्प पाऊस, त्यानंतर खोड किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेंगांची वाढ खुंटली. तालुक्यात आता पाच दिवसांपासून अधूनमधून सलग सुरू आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या तब्बल सात हजार हेक्टरमधील सोयाबीनला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर हे नवीन संकट ओढवल्याने चिंतेत भर पडली आहे.
धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली. लागलीच खोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक शेंगा बेपत्ता झाल्या आहेत. उर्वरित शेंगा भरत असताना, आता तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला.
तालुक्यात पाऊस दररोज दमदार हजेरी लावत आहे. ज्या शेतात जलसंचय होतो, त्या शेतात भरलेल्या शेंगांना कोंब फुटत आहे. तालुक्यातील गव्हा फरकाडे, कावली, वसाड, अंजनसिंगी, नायगाव, सोनोरा काकडे, चिंचोली, झाडगाव, गिरोली, चिचपूर, मंगरूळ दस्तगीर, झाडा, आष्टा तसेच नदीकाठच्या अनेक शिवारांतील सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसू लागला आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असताना जेमतेम जुळवाजुळव करून शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. पिकांची स्थितीसुद्धा चांगली होती. परंतु आता अर्धे पीक खराब झाले असून पावसामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न द्यायचे कसे, असा प्रश्न काही शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. गतवर्षी अनेक शेतकºयांना पीक नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही, त्या शेतकºयांच्या तालुका मुख्यालयी येरझारा सुरूच आहेत. शासनाने या संकटकाळात तरी त्वरित मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.

तालुक्यातील कमी अधिक पाऊस तसेच सोयाबीनला खोडअळीचा प्रादुर्भाव व आता कोंब फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. संबंधित यादी प्रशासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल.
- सागर इंगोले,
तालुका कृषी अधिकारी

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले. दरवर्षीप्रमाणे नापिकीचे संकट यंदाही ओढावले आहे.
- प्रल्हाद फरकाडे,
शेतकरी, गव्हा फरकाडे

Web Title: Soybean under water in Dhamangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.