परतीच्या पावसाने सोयाबीन गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:16+5:30

मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Soybean custard with return rains | परतीच्या पावसाने सोयाबीन गारद

परतीच्या पावसाने सोयाबीन गारद

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : सूर्यदर्शन नसल्याने पीक ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यात यंदा अतिपावसाने कहर केला. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी बरसरत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने शनिवारपासून जोरदार हजेरी लावली असून, सोमवारी ढगाळ वातावरण कायम होते. सोमवारी सकाळीही तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा शिरवा आला. आता पुढील दोन-तीन दिवस पाऊस उघडण्याची शक्यता नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अनेकांच्या शेतातील धान व सोयाबीन कापण्यात आले असून, ते उचलण्यापूर्वीच पावसाने झोडपल्याने पीक हातून जाण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे .
 
Web Title: Soybean custard with return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस