शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

५५ हजार हेक्टर क्षेत्राला पेरणीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:44 AM

हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

ठळक मुद्दे‘आर्द्रा’कडे डोळे : खरिपाची तयारी पूर्ण, पावसाने केला खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशा स्थितीत उत्पादकांच्या आशा आता शनिवारी सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे यंदा ७ लाख २८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यात तालुक्यात सुमारे ५५ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही तालुक्यांत पावसाचे आगमन झाले. मात्र, त्यानंतर थेंबही कोसळला नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे दुष्काळाचे चित्र पाहावयास मिळाल्याचे वडीलधारी मंडळी सांगतात. एकीकडे हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. असे असताना ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविली. पावसाळ्यातील पहिलेच वाहन उंदीर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण, पहिले वाहन तसेच नक्षत्राने शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने मूग आणि उडीद पीक येण्याची कमीच शक्यता आहे.पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग आणि उडिदाप्रमाणे कापूस उत्पादक चिंताक्रांत झाला आहे. कारण लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन निघते. जसजसा कापूस लागवडीला उशीर होत जाईल, तसतसे कापसाचे उत्पादन घटत जाण्याची शक्यता आहे. कारण हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. म्हणून उत्पादकांच्या आशा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत. या नक्षत्रात हत्ती वाहन असल्याने अधिक पावसाचा अंदाज बांधला जात आहे. जर या चरणात चांगला पाऊस झाला, तर ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पुनर्वसु नक्षत्रात पिके लहान असल्यामुळे मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज भासेल. पुष्य २० जुलैपासून आणि ३ आॅगस्टला आश्लेषा नक्षत्रास सुरुवात होणार आहे. यानंतर मघा नक्षत्रात पावसाची शक्यता कमीच असते.पंचक्रोशीतील शेतकरी हवालदिलअंजनगाव बारी : यावर्षी पाऊ स मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्राला १० दिवस झाल्यानंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता शेतकऱ्यांनी डोळे आकाशाकडे लावले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊ स येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्याप हुलकावणी दिलेली आहे.अंजनगाव परिसरात शेतीच्या मशागतीची कामे, नांगरणी, वखरणी, फण-पºहाट्या वेचणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. जमीन तापली असल्याने मृग नक्षत्रातील दोन ते तीन पाणी जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत ती शांत होत नसल्याने शेतकरी पेरणीला सुरुवात करीत नाही. परिसरात पेरणीकरिता ८० टक्के जमिनी तयार असून, २० टक्केच जमिनीचे मशागतीचे काम सुरू आहे. तेही आता संपुष्टात येत आहे.वरुणराजा निद्राधीनपावसाअभावी कृषिसेवा केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी दिसत नाही. तेथे सध्या शुकशुकाट आहे. कृषिसेवा केंद्र विक्रेत्यांनी सर्व प्रकारची खते, बियाणे, औषधी आणुन शेतकºयांना उपलब्ध करून दिली. मात्र, वरुणराजाची झोप जोवर उघडणार नाही, तोपर्यंत कृषिसेवा केंद्र विक्रेत्यांनाही गुतविलेली रक्कम मिळविता येणार नाही.बियाण्याचे दर वधारलेपावसाची हुलकावणी पाहता, यंदा कपाशी, सोयाबीन या पिकांचा पेरा सर्वाधिक राहणार आहे. तूर, मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी, तीळ ही पिके कमी प्रमाणात पेरली जातील. यावर्षी बियाण्याचे दर कमालीचे वधारल्याने पाऊस चांगला झाल्यास पेरणी करणार, नाही तर शेती पेरणार नाही, असे शेतकºयांनी म्हटले आहे. जून आतापर्यंत कोरडा गेला असून, जुलैच्या १५ तारखेनंतर पेरणी झाल्यास काहीच हाती लागणार नाही, अशी भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती