कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST2018-03-20T00:30:02+5:302018-03-20T00:30:02+5:30
शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला
आॅनलाईन लोकमत
अमरावती- शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
ज्यांच्यासाठी लाखो रूपयांचा खर्च सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचीच या महोत्सवात नगण्य स्थिती असल्याने, हा महोत्सव शेतकºयांसाठी की कृषी विभागाचे गोडवे गाण्यासाठी असा सवाल विचारल्या जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळ, नैसगीक आपत्ती व लहरी पाऊस यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसंदर्भात मार्गदर्शन करणे, शेतकरी व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल महत्वाचे ठरत असतांना याविषयीची माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहोचलीच नाही. कार्यक्रमास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्चा आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचे प्रतिक बनल्या आहेत.
अश्या प्रकारच्या कृषीमहोत्सवात नवीण वाणांची माहीती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी तज्ञ यांची थेट भेट, परिसंवाद, चर्च्चा व याद्वारे शेतकºयांच्या शंकाचे निरसन तसेच शेतकरी ते थेट ग्राहक विक्री याविषयीचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरत असतांना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मागील महिण्यात एका खासगी संस्थेद्वारा कृषी प्रदर्शन आयोजित होते. त्याला शेतकºयांचा प्रतिसाद लाभला, या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कृषी विभागाचे असलेल्या या प्रदर्शनात आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुच असलेला शेतकरीच हरविला असल्याचे वास्तव आहे..
शहरात असूनही कृषिमंत्र्याची महोत्सवाकडे पाठ
उद्घाटनाला कृषीमंत्री,गृहराज्यमंत्री,पालकमंत्री,खासदार जिल्ह्यातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आले.प्रत्यक्षात ना.पांडुरंग फुंडकर पक्षाच्या बैठकीनिमित्य शहरात उपस्थित असताना फिरकलेच नाही. ना. रणजीत पाटील यांच्यासह बहुतेक आमदार अनुपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले उपस्थित होते. त्यामुळे उद्घाटनाची नियोजित वेळ पाच तासांनी वाढवूनदेखील कृषी विभाग तोंडघसी पडल्याचे वास्तव आहे.