शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला माफ करा, चूक झाली..! रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरणी गावकऱ्यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:44 IST

Amravati : पोहोचले लोकमत, झाले एकमत, रेट्याखेडा येथील ग्रामस्थांनी मागितली माफी

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क रेट्याखेडा (चिखलदरा) : गावात घडलेली घटना निंदनीय आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आमच्याकडून चूक झाली आहे. आम्हाला माफ करा. यानंतर असे होणार नाही. आम्ही झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करतो. म्हाताऱ्या आजीचा औषधोपचार करू. कुठल्याच प्रकारचा द्वेषभाव न ठेवता आम्ही सर्व गावकरी एकोप्याने, एका कुटुंबाप्रमाणे राहू, या शपथेसह संपूर्ण गावकऱ्यांनी शेलूकर कुटुंबाची पाया पडून माफी मागितली. 

लोकमतने चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील घटना उघडकीस आणल्यानंतर ग्रामस्थांना उपरती झाली आणि मंगळवारी त्यांच्यात माफीबद्दल एकमत झाले. दरम्यान आदिवासी वृद्ध महिलेची धिंड काढणारा पोलिसपाटील बाबू जामूनकर याला पोलिसपाटील पदावरून मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. ही कार्यवाही सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी केली आहे.

लोकमतची चर्चा लोकमतने रेट्याखेडा येथील घटनाक्रम उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. रेट्याखेड्यातही अनेक जण घटनेचे वृत्तांकन वाचताना दिसून आले, तर अधिकारीसुद्धा त्या वृत्ताबद्दल चर्चा करीत होते.

दवंडीवर आले गावकरी मागील चार दिवसांपासून दहशतीखाली असलेल्या रेट्याखेडा गावात पोलिसांच्या चकरा वाढल्या. परिणामी भीतीपोटी गावकरी गावाबाहेर निघून गेले होते. गावसभा ठरविल्यानंतर मंगळवारी दुपारी २ वाजता काही प्रमाणात त्यांनी उपस्थिती दर्शविली. गावातीलच एका झाडाखाली ही सभा भरली.

 

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती