सोनल कॉलनीतील नियमबाह्य बांधकाम पाडले
By Admin | Updated: August 23, 2015 00:29 IST2015-08-23T00:29:38+5:302015-08-23T00:29:38+5:30
येथील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील पुष्पकुंज अपार्टमेंटमध्ये नियमबाह्य असलेले बांधकाम पाडण्याची कारवाई महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी केली.

सोनल कॉलनीतील नियमबाह्य बांधकाम पाडले
आयुक्तांचे आदेश : अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई
अमरावती : येथील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील पुष्पकुंज अपार्टमेंटमध्ये नियमबाह्य असलेले बांधकाम पाडण्याची कारवाई महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी केली. यात पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील नियमबाह्य बांधकाम पाडण्यात आले आहे. ही कारवाई सुटीच्या दिवशीही आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
विनापरवानगी आणि अतिरिक्त बांधकाम असलेल्या मालमत्तांना वर्गवारीनुसार कर आकारणीची प्रक्रिया सुरु असताना नियमबाह्य बांधकाम पाडण्यात आल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाची धास्ती निर्माण झाली आहे. सोनल कॉलनी येथील नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या सुजित काळमेघ आणि कडू यांना शुक्रवारी रात्री सदर बांधकाम पाडले जाणार अशा सूचना देण्यात आल्यात.