कौटुंबिक कलहातून मुलाने बापाला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:01 IST2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:01:03+5:30
रमेशच्या पत्नीचे ११ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तो व्यसनाधीन राहायचा. अशातच वासनेची भूक शमविण्यासाठी जन्मदात्रीवर त्याची नजर पडली. तो अनैतिक कृत्य करीत असताना दिनेशने कडाडून विरोध केला. झटापटीत रमेश कोसळला. जमिनीवर असलेल्या धारदार वस्तूंमुळे चेहऱ्यावर गंभीर वार झाले. रक्तस्रावाने तो जागीच गतप्राण झाला.

कौटुंबिक कलहातून मुलाने बापाला संपविले
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहगाव : मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथे कौटुंबिक कलहातून शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास मुलाने बापाला संपविले. पत्नीच्या मृत्यूनंतर उफाळून आलेली वासना आणि ती शमविण्यासाठी माय-लेकाच्या नात्याशी केलेली प्रतारणा ही पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रमेश माणिकराव आकोटकर (५६) असे मृताचे, तर दिनेश (३१) असे त्याला संपविणाऱ्या मुलाचे नाव आहे. रमेशच्या पत्नीचे ११ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तो व्यसनाधीन राहायचा. अशातच वासनेची भूक शमविण्यासाठी जन्मदात्रीवर त्याची नजर पडली. तो अनैतिक कृत्य करीत असताना दिनेशने कडाडून विरोध केला. झटापटीत रमेश कोसळला. जमिनीवर असलेल्या धारदार वस्तूंमुळे चेहऱ्यावर गंभीर वार झाले. रक्तस्रावाने तो जागीच गतप्राण झाला. चेहरा विद्रूप झालेल्या अवस्थेत त्याचे प्रेत अंगणात पडून होते. पोलीस पाटलांनी घटनेची माहिती शिरखेड पोलीस ठाण्यात दिली.
चार तासांत अटक : पसार दिनेशचा काटपूर शिवारातील बाभूळबंदी जंगलातून चार तासांत शोध घेऊन जेरबंद केले. ठाणेदार केशव ठाकरे, पोलीस निरीक्षक व्ही.बी. पांडे, अंमलदार मनोज टप्पे, संजय वाघमारे, कैलास हटवार, बळवंत टाके, अनूप मानकर, छत्रपती करपते, रामेश्वर इंगोले, संजय वंजारी, विजय ठेकडे, रोशन राऊत व एलसीबी पथकाने कारवाई केली.