बँकेत सोशल डिस्टन्सची ऐसीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:56+5:30
बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

बँकेत सोशल डिस्टन्सची ऐसीतैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्स हा एक महत्त्वाचा उपाय असल्याने संपूर्ण देशात त्याला अंवलब होत आहे. अंजनगांव सूर्जी शहरात मात्र स्टेट बँक, सेंट्रल बँकेत 'सोशल डिस्टन्स'चे नागरिकाना पडल्याने धोका टाळण्याच्या दृष्टीने येथे नियम कठोर करणे गरजेचे आहे.
बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. त्यासाठी त्यांना बँकेत येणे गरजेचे असते. अंजनगाव सूर्जी शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँका जवळ-जवळ असल्याने सकाळीच काही निराधारांची गर्दी बँक परिसरात वाढत आहे. त्यातही स्टेट बँकेत व सेंट्रल बँकेत शनिवारी ग्राहकांची मोठी रांग लागली. ती पहील्या माळ्यावरून खालपर्यंत होती. रांगेत कुठेही अंतर नसून एक दुसऱ्यांना अगदी जवळ ऊभे रहावे लागल्याने एखाद्या व्यक्तीस संसर्ग असल्यास विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका
महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. नागरिकांना अजूनही कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बँक ग्राहकांची गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासनाचा सहकार्य का घेत नाही, असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे. स्टेट बँकेच्या व सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढल्याचे दिसत असताना आवश्यक त्या उपायोजना करण्याची गरज होती. परंतु सदर अधिकाºयांनी ही बाब गंभीरतेने का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.