शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले.

ठळक मुद्देसात वर्षांपासून शेतात पाणी : टेकडीवर बांधला पूल, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निम्नवर्धा प्रकल्प कार्यालयाने चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे सात वर्षांपासून शेतात पाणी साचत असल्याने वरूड बगाजी येथील शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले. मात्र पुलाची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. याच भागात काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे अन्य शेतीचे नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. मात्र निम्नवर्धा प्रकल्पाने आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा ओंकार काष्टे, चंद्रशेखर भनारकर, नामदेव काष्टे, एकनाथ काष्टे, रामाजी पचाकरे, रामदास पचारे, अरविंद धोटे, कैलाश मोहनकर, सदाशिव पचारे, विनोद झोपाटे, उमेश म्हात्रे यांनी दिला.शेतकरी देशोधडीलाउताराला न बांधता, टेकड्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीचा मोठा भाग हा दरवर्षी नापेर राहतो. शेतकऱ्यांना या भागात उत्पादन तर घेता येत नाहीच, जागा कायमस्वरूपी बाधित होण्याची चिन्हे आहेत. शेतकºयांना प्रकल्प प्रशासन देशोधडीला लावत असल्याचा आरोप होत आहे.निम्न वर्धा प्रकल्प प्रशासनाने टेकडीच्या ठिकाणी पूल बांधला. त्यामुळे माझ्यासह १० शेतकऱ्यांच्या २५-३० एकरांत सात वर्षांपासून पाणी साचत आहे. समस्येवर सात दिवसांत तोडगा काढला नाही, तर आम्ही बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेऊ.- ओंकार काष्टे, शेतकरी, वरूडया भागातील पुलाची निर्मिती सात वर्षांपूर्वी झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर दुसरा रस्ता काढून देण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत.- रवींद्र वऱ्हाडे, कार्यकारी अभियंतानिम्न वर्धा प्रकल्प, वर्धा

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी