ऑनलाईन फसवणुकीतील ८० हजार मुळ मालकाला परत करताच चेहऱ्यावरील हास्य फुल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST2021-04-29T04:10:03+5:302021-04-29T04:10:03+5:30
अमरावती: ऑनलाईन फसवणुकीतील ८० हजार रुपयांची रोख मुळ फिर्यांदीला परत देऊन सायबर पोलिसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. ...

ऑनलाईन फसवणुकीतील ८० हजार मुळ मालकाला परत करताच चेहऱ्यावरील हास्य फुल्ले
अमरावती: ऑनलाईन फसवणुकीतील ८० हजार रुपयांची रोख मुळ फिर्यांदीला परत देऊन सायबर पोलिसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ तांत्रिक पध्दतीने तपास करून विविध बॅकांच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधला. दोन्ही तक्रारकर्त्यांचे पैसे राजस्थान येथील जोधपुर व अल्वार जिल्ह्यातील बॅकेतून परत मिळविण्यात यश प्राप्त केले. पोलीससुत्रानुसार, प्रफुल्ल मारोती नांदुरकर (रा. आनंदनगर, भातकुली) यांनी फेसबुकवर केटीएम दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून अनोळखीसोबत आर्थिक व्यवहार केला होता. सायबर गुन्हेगारांनी वाहन विक्रीच्या नावावर विश्वास संपादन करून त्याच्याकडून २९ हजार रुपये उकळले होते. तर हाताला मिळेल तर काम करणारा गिरीष योगेश्वर मेश्राम (रा. सबनिसप्लॉट) याला फोन- पे ची केवायसी करायचे असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी ४९ हजार १०४ रुपयांने फसविले होते. या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने सायबर ठाण्यातील पोलिसांनी तांत्रिक अभ्यास करून दोन्ही गुन्ह्यातील पैसे परत मिळविले आहे.
बॉक्स
या पथकाची कामगिरी
गुन्हा दाखल होताच घटनेचे गांर्भीय बघून पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिमा दाताळकर, एपीआय रविंद्र सहारे, पोलीस हवालदार चैतन्य रोकडे, शैलेंद्र अर्डक यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून, सदर गुन्ह्यातील संशयीत बॅक खातेदाराकडून पैसे वळती करण्यात यश प्राप्त केले.