युकेतून परतलेल्या सहा व्यक्ती निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:19+5:302020-12-27T04:10:19+5:30
अमरावती : इंग्लडमधून राज्यात व जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यात जिल्ह्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर ...

युकेतून परतलेल्या सहा व्यक्ती निगेटिव्ह
अमरावती : इंग्लडमधून राज्यात व जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यात जिल्ह्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात आठ प्रवासी आलेत. यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, अन्य दोघांचे स्वॅब तपासणीला पाठविले आहे. या दोन्ही व्यक्तींना लक्षणे नसले तरी त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. अहवालाची प्रतीक्षा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
सध्या इग्लंडमधील काही भागात कोरोनाचा नवा विषाणूचे संक्रमण आढळून आले आहे व या नव्या स्ट्रेनचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने युकेमधून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सध्या राज्यासह जिल्ह्यात सुरू झालेले आहे. या कालावधीत युकेतून परतलेल्या आठ प्रवाशांची नावे जिल्हा प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झाली होती. यापैकी सात प्रवासी अमरावती महापालिका क्षेत्रातील व एक दर्यापूर् तालुक्यातील आहे. यात अमरावतीतील सहा प्रवाशाचे नमुने अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. याव्यतिरिक्त अमरावतीतील एक व दर्यापुरातील एक अशा दोन प्रवाशांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे. त्यांचे अहवाल अप्राप्त असल्याने या दोन्ही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तपासणी
परदेशातून तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी सध्या रेल्वेस्थानक व बसस्थानकावर केली जात आहे. त्यांची प्रवासहिस्ट्री जाणून त्यांना लक्षणे आहेत का, शरीराचे तापमान व रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल तपाससी जात आहे. लक्षणे दिसल्यास त्यांचे नमुने घेतले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.