मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर अपघात, सहा जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:23 IST2021-12-01T19:22:15+5:302021-12-01T19:23:05+5:30
Amravati News मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर अपघात, सहा जण ठार
अमरावती : मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
मध्य प्रदेशातील तिवरखेड येथून पट्टण मार्गे मुलताईला जाणारी खासगी प्रवासी बस (एमएच ३१ सीजी ४४१९) ला मुलताईकडून पट्टणकडे धान्य घेऊन येणाऱ्या ट्रक (एमपी ४८ एच ०६१९) ने धडक दिली. यामुळे बसचा चुराडा झाला, तर ट्रक उलटून रस्त्याच्या कडेला पडला. ट्रकचा चालक व वाहक फरार झाले असून जखमींना मुलताई पोलीस आणि नागरिकांनी मुलताई रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे