पाळा येथील सिंगल फेज लाईन सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:07+5:302021-07-21T04:11:07+5:30
मागील दीड ते दोन महिन्यापासून मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्री-बेरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ...

पाळा येथील सिंगल फेज लाईन सुरू!
मागील दीड ते दोन महिन्यापासून मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्री-बेरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्याकुट्ट अंधारात विंचू, साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला होता. शेतामध्ये रात्रीच्या वेळी पिकांची चाकरी करणारे शेतकरी व शेतात वास्तव्यास असणारे रखवालदार यांना सिंगल फेज लाईन बंद असल्यामुळे त्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला होता. सध्या 90 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पेरणी आटोपली असून गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पेरलेले पीक वर येण्यासाठी रात्री-बेरात्री पाणी सोडण्यासाठी शेतात जावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेऊन मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन त्वरित सुरू करण्यात यावी. अन्यथा प्रहार युवा संघटनेच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला होता. परिणामी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्येचा सतत पाठपुरावा सुद्धा केला. अखेर मराविम कंपनीने शेतकरी शेतमजूर व शेतात राहणाऱ्या रखवालदाराची व्यथा जाणून घेतली व सिंगल फेज लाईन सुरु करून शेतकर्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता अवघड यांचे प्रहार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पाळा येथील युवा सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपत नेवारे, प्रहारचे कार्यकर्ता नरेंद्र सोनागोते, राजूभाऊ बीसाद्रे, किशोर वानखडे, अंजुमनशहा उपस्थित होते.