अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:55+5:302020-12-11T04:38:55+5:30
एक जखमी : काकडा - इसापूर मार्गावरील घटना शिंदी बु. : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाला, ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच मृत्यू
एक जखमी : काकडा - इसापूर मार्गावरील घटना
शिंदी बु. : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अचलपूर तालुक्यातील काकडा ते इसापूर मार्गावर गुरुवारी सकाळी ही घटना उघड झाली. सुधीर गौतम मोहोड (३०), असे मृताचे, तर जखमी भीमराव तुळशीराम दामले (३२, इसापूर), असे जखमीचे नाव आहे.
बुधवारी रात्री एम एच २७ जी ४०२३ या दुचाकीने येत असताना त्यांच्या वाहनास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गुरुवारी सकाळी मोहोड व दामले रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. नेमका अपघात कसा झाला, हे समजू शकले नाही. पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुधीर मोहोड दगावल्याचे लक्षात आले. हा अपघात रात्रीचे वेळी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झाल्याची चर्चा काकडा - इसापूर येथील नागरिकांत आहे. पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी पाठविण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलीस पाटील महादेव खडसे, पोलीस कर्मचारी प्रभुदास गडलिंग, माधवराव जांबू घटनास्थळी उपस्थित होते.