सिंगल कॉलम बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:19+5:302020-12-11T04:39:19+5:30

संगई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड अंजनगाव सुर्जी : येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ...

Single column news | सिंगल कॉलम बातम्या

सिंगल कॉलम बातम्या

संगई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

अंजनगाव सुर्जी : येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीसाठी गुणवत्ता यादीत निवड झाली. ते शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरले आहेत. त्यात जयेश धुळे प्रथम, जय तडस दुसरा, आलेख तडस तिसरा, तर आनंद पिंगे चौथ्या स्थानावर राहिला.

---------

अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द

अमरावती : जिल्हाधिकारी यांच्याकडून अर्ज सादर केलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आाली असून, आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत. अनुकंपाधारक उमेदवारांची (गट-क व गट-ड) तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादीवर आक्षेप/हरकती असल्यास संबधित कार्यालयप्रमुख यांच्यामार्फत लेखी पुराव्यासह आक्षेप/हरकती प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

----------------

निधन

फोटो पी १० प्रकाश राऊत

प्रकाश राऊत

चांदूर रेल्वे : तालुक्यातील कळमजापुर येथील रहिवासी तथा बांधकाम विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता प्रकाश राऊत (६१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

-------------------

१५ डिसेंबर रोजी राज्यात ''''''''घरकुल मंजूरी दिवस

भातकुली : महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत राज्यात येता १५ डिसेंबर हा दिवस ''''''''घरकुल मंजूरी दिवस'''''''' म्हणून तर २० डिसेंबर हा दिवस ''''''''प्रथम हप्ता वितरण दिवस'''''''' साजरा केला जाणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे ही जबाबदारी आहे.

----------

Web Title: Single column news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.