शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम शेती करणार मालामाल; शेतकऱ्यांना मिळणार ४.१८ लाखांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:28 IST

Amravati : कापड उद्योगात रेशीमला मोठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : योग्य व्यवस्थापन, शासन योजनांचा लाभ, बाजारपेठेत वाढती मागणी व मिळणारा चांगला भावामुळे रेशीम शेती फायद्याची ठरत आहे. मनरेगा अंतर्गत ४.१८ लाखांचे अनुदानही मिळत आहे. शिवाय हमखास उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढला आहे.

रेशीम शेती हा एक उत्तम जोडधंदा आहे व अल्प कालावधीचे पीक असल्याने दुसऱ्या वर्षापासून वर्षाला पाच पिके घेता येतात. तुतीच्या लागवडीनंतर १५ वर्षापर्यंत पुन्हा लागवड करण्याची गरज भासत नाही. या शेतीत ६० टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग असल्याने रोजगार निर्मितीही होत आहे.

रेशीम शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना कळावे, यासाठी ९ फेब्रुवारी दरम्यान महारेशीम अभियान जिल्ह्यात राबविण्यात येते. तुती रेशीम उद्योग, रेशीमशेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करता यावी, यासाठी रेशीमरथ जनजागृती करीत असल्याची माहिती जिल्हा रेशीम अधिकारी दीपाली नागोलकर यांनी दिली.

ही पात्रता अन् कागदपत्रे आवश्यक लाभार्थी हा अल्पभूधारक, अनु. जाती- जमातीमधील असावा, आठमाही सिंचनाची सुविधा असलेली बागायती, स्वतःची जमीन असावी. ग्रा.पं.चा मनरेगा आराखडा, ग्रामसभेचा ठराव, लाभार्थी जॉब कार्डधारक व मजूर म्हणून काम करणारा, तसेच सातबारा, ८ अ, जॉब कार्ड, आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स व २ फोटो आवश्यक आहे

एका एकरात दीड लाखाचे उत्पन्न तुती लागवडीपासून पहिल्या वर्षी ५०० अंडीपुंजातून २५० किलोचे उत्पन्न होते. यामध्ये दोन पिके घेता येतात व दुसऱ्या वर्षी चार पिके व ५०० किलो कोष उत्पादन करता येते. दुसऱ्या वर्षापासून ५०० ते ६०० किलो कोषचे म्हणजे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते. ४० ते ५० हजारांचा खर्च येतो, म्हणजे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते.

टॅग्स :farmingशेतीAmravatiअमरावती