परतवाड्यात निघाली शांतता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:34+5:30
शांतता रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे, अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, राजेंद्र पाटील, सदानंद वानखडे व राऊत यांच्यासह परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा या तिन्ही ठाण्यांचे पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी सहभागी झाले.

परतवाड्यात निघाली शांतता रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सोमवारी शांतता रॅली काढण्यात आली. शहरात सर्वत्र शांतता असून, परिस्थिती सर्वसामान्य असल्याचा निर्वाळा या शांतता रॅलीने शहरवासीयांना दिला.
शांतता रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे, अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, राजेंद्र पाटील, सदानंद वानखडे व राऊत यांच्यासह परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा या तिन्ही ठाण्यांचे पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी सहभागी झाले. त्यांच्यासोबतच शांतता समितीचे सदस्य, रोटरी क्लब व जेसीआयचे पदाधिकारी, नगर परिषद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. गौर, विद्यार्थी, शिक्षक, महाराष्टÑ उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वृंद, माजी नगराध्यक्ष रफीक सेठ, डॉ. नितीन मानकर, मुन्ना जोशी, बंटी केजडीवाल, लोहिया, मनोज नंदवंशी, नगर परिषद उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक आणि डॉक्टर मंडळींनी या शांतता रॅलीत आपला सहभाग नोंदविला.
रॅलीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची सभा पार पडली. यात शहरात घडलेली घटना, उडालेल्या अफवा यावर प्रकाश टाकीत शहरात शांतता व कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांनी शहरवासीयांसह उपस्थितांना ग्वाही दिली. आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा कानी पडल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे त्यांनी सूचित केले.