शासकीय कार्यालयात सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:01 IST2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:01:01+5:30
देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे.

शासकीय कार्यालयात सन्नाटा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शासकीय कार्यालयांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्क्यांवर आणली. नागरिक आणि अभ्यागतांना कार्यालयात बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवार, २३ मार्चपासून शासकीय कार्यालयांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांतील गर्दी ओसरल्याने जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे. एका दिवसात केवळ ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच टक्के उपस्थितीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत निर्देश जिल्हा प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहे. हे कार्यालयातील महत्त्वाच्या व प्रलंबित कामे पार पाडण्यासाठी रोटेशन पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचाºयांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत जमाबंदी करण्यात आल्याने शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाºया नागरिकांची संख्या रोडावली आहे. जमावबंदी उठेपर्यंत कोणतेही काम होणार नसल्याने नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले होते. त्यातच एसटी महामंडळाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान ३१ मार्चपर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के उपस्थिती राहणार आहे. अनावश्यक कामानिमित्त नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.