अकबरकालीन डाक व्यवस्थेच्या खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:45+5:30

अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले.

Signs of Akbar's postal system | अकबरकालीन डाक व्यवस्थेच्या खुणा

अकबरकालीन डाक व्यवस्थेच्या खुणा

ठळक मुद्देअचलपूर : फरमानपुरा, कासदपुऱ्याला वेगळेच महत्त्व

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अकबराच्या डाक व्यवस्थेतील खुणा आजही अचलपुरात बघायला मिळतात. यात अचलपुरातील फरमानपुरा, कासदपुरा आणि संदेशवाहक ‘हूमर’ कबुतराला वेगळेच महत्त्व प्राप्त आहे.
११५० मध्ये बगदादच्या सुलतानाने कबुतरांच्या माध्यमातून डाक व्यवस्था सुरूकेली. चंगीजखान याच्या राज्यविस्ताराच्या धोरणाबरोबर पुढे हा डाकखाना विस्तारित झाला. सम्राट अकबराने मात्र या डाकव्यवस्थेला प्रशासनात रीतसर समाविष्ट केले. यात पत्र पाठविण्याकरिता, संदेशवहनाकरिता इराणी कबुतरांचा वापर केला जायचा. या कबुतराला हूमर म्हटले जायचे. या हूमर कबुतराची चोच जाड-मोठी असते. हे कबुतर पन्नास किलोमीटरपर्यंत संदेश, पत्र घेवून जायचे. हे हूमर कबुतर आजही अचपूर शहरात बघायला मिळतात. शौकिनांनी ते पाळले आहेत.
अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले. यात संदेशवहन व मनोरंजनाकरिता मोठ्या प्रमाणात कबुतरांचा वापर होत होता. त्याकाळी राजा, सुलतान, नवाब यांच्या आदेशाला फर्मान म्हटले जायचे. जेथून फर्मान सोडले जायचे, तो म्हणजे फर्मानपूरा. हे फर्मान पोहचविण्याचे काम काशीद करायचे. काशीद पूर्वी संदेश पायी पोहचवित. काशिदांनी ही पारंपरिक पद्धत नाकारली आणि कबुतरांच्या माध्यमातून संदेशवहन सुरू केले. काशीद जिथे राहायचे, तो कासदपुरा. दोन्ही भाग एकमेकांना खेटून आहेत. जुन्या राजधान्यांमध्ये फर्मानपुरा आणि काशीदपुरा या जागा मिळतात. लखनौ (उत्तरप्रदेश), बिदर (कर्नाटक), भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ते आहेत. यामुळे अचलपूरचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

अकबराच्या डाक व्यवस्थेत २० हजार कबुतरे होती. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेत अचलपूरहून बºहाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. आज या व्यवस्थेच्या उल्लेख व ऐतिहासिक खुना फत्तेपुरा शिक्रीला बघायला मिळतात.
- अनिरुद्ध पाटील
इतिहासक अभ्यासक, अमरावती

Web Title: Signs of Akbar's postal system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.