वरूड येथे युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST2021-07-16T04:10:48+5:302021-07-16T04:10:48+5:30

फोटो - वरूड : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी, या मागणीसाठी ...

Signature campaign of Youth Congress at Warud | वरूड येथे युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

वरूड येथे युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

फोटो -

वरूड : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी, या मागणीसाठी पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात वरूड येथे नागरिकांचा अभिप्राय घेत पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधात १४ जुलैपासून मोर्शी विधानसभा युवक कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसद्वारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोहिमेच सुरुवात करण्यात आली.

मोर्शी विधानसभा युवक कॉंगेस अध्यक्ष मनोज इंगोले, वरुड तालुका कॉंगेस अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, वरूड शहर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल चौधरी, नगरसेवक प्रशांत धुर्वे, धनंजय बोकडे, अमरावती जिल्हा सेवा दलचे महासचिव सुधाकर दोड, तालुका सेवा दलचे अध्यक्ष नरेंद्र पावडे, वरूड शहर सेवादल अध्यक्ष मनीष कुबडे, तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष कोमल पांडव, वरुड शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा सविता काळे, शहर महिला सेवा दल अध्यक्ष रंजना मस्की, अजहर काझी, चेतन देवते, प्रदीप पवार, शैलेश ठाकरे, वैभव पोतदार आदी उपस्थित होते.

Web Title: Signature campaign of Youth Congress at Warud