महापुरुषांना नमन करुन श्रीकांत देशपांडे यांची विजयी रॅली

By Admin | Updated: June 25, 2014 23:31 IST2014-06-25T23:31:31+5:302014-06-25T23:31:31+5:30

शिक्षकांचे आमदार म्हणून निर्वाचित झाल्यानंतर श्रीकांत देशपांडे यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना नमन करुन बुधवारी विजयी रॅली काढली. ढोल- ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आणि शेकडो

Shrikant Deshpande's victory rally in honor of the great men | महापुरुषांना नमन करुन श्रीकांत देशपांडे यांची विजयी रॅली

महापुरुषांना नमन करुन श्रीकांत देशपांडे यांची विजयी रॅली

अमरावती : शिक्षकांचे आमदार म्हणून निर्वाचित झाल्यानंतर श्रीकांत देशपांडे यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना नमन करुन बुधवारी विजयी रॅली काढली. ढोल- ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत खुल्या जीपगाडीवर निघालेल्या या विजयी रॅलीने अंबानगरी दुमदुमन गेली. मंगळवारी रात्रीपर्यत मतमोजणी पार पडली. १६ व्या फेरीत शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांचा ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला.
निवासस्थानी श्रीकांत देशपांडेंची पेढेतुला
शिक्षक मतदारसंघात मागील २० वर्षांपासून ‘फिल्डिंग’ लावणाऱ्या श्रीकांत देशपांडे यांना अखेर गुरुजींनी विधिमंडळात आमदार म्हणून पाठविल्याचे स्पष्ट झाले. देशपांडे यांच्या विजयात अनेक शिक्षकांचे हात कामी आल्याचे आजच्या विजयी रॅलीने दाखवून दिले. रॅलीच्या प्रारंभी देशपांडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदी महापुरुषांच्या पुतळ्याला नमन केले.त्यानंतर येथील मालविय चौकातून खुल्या जिपगाडीवर विजयी रॅली काढण्यात आली. जयस्तंभ चौक, राजकमल चौक पुढे राजापेठ येथे जल्लोष करण्यात आला. रॅली निवासस्थानी पोहचताच श्रीकांत देशपांडे यांची पेढेतुला करण्यात आली. विजयी रॅलीदरम्यान खुल्या जिपगाडीवर किशोर श्रृंगारे, सैय्यद राजीक, नीता गहरवाल,विश्मय ठाकरे, दिनेश बूब, बोपशेट्टीवार आदी होते. यावेळी शिक्षकांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. विजयी रॅलीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते. नरेंद्र गुल्हाणे, रमेश पाटील, उंबरहांडे, निलेश देशमुख, संतोष राठोड, हुकूम कासट, प्रकाश कासट,किशोर देशमुख, भैय्या कुऱ्हेकर ,मनोज पांडे आदींचा रॅलीत सहभाग होता.

Web Title: Shrikant Deshpande's victory rally in honor of the great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.