खापर्डे वाड्यात ‘श्रीं’चा प्रगटदिन

By Admin | Updated: February 19, 2017 00:14 IST2017-02-19T00:14:50+5:302017-02-19T00:14:50+5:30

येथील राजकमल चौकातील खापर्डे वाड्यात संत गजानन महाराजांचा प्रकटदिन शनिवारी साजरा करण्यात आला.

Shree's manifesto in Khaparda wada | खापर्डे वाड्यात ‘श्रीं’चा प्रगटदिन

खापर्डे वाड्यात ‘श्रीं’चा प्रगटदिन

अमरावती : येथील राजकमल चौकातील खापर्डे वाड्यात संत गजानन महाराजांचा प्रकटदिन शनिवारी साजरा करण्यात आला. या ठिकाणी श्री संत गजानन महाराज येथील औदुंबराच्या झाडाखालील चौथरावर बसले होते. तसा उल्लेख दासगणु महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे.
दादासाहेब खापर्डे हयात असताना संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने हा वाडा पावन झाला होता. तेव्हापासून येथे भक्तांची श्रध्दा आहे. शनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान या ठिकाणी श्रींची महाआरती करण्यात आली. विकास पाध्ये, बबन रडके, आशिष पांडे, नितीन गऊर, केशव वानखडे, राजेंद्र परिहार, मिलिंद लेंधे, श्याम श्रीवास, पीयूष शहा, येवतीकर पहेलवान, संजय देशमुख, लक्ष्मीे शर्मा, पोर्णीमा देशमुख, एकता मराठे, यादव आदी उपस्थित होते. प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Shree's manifesto in Khaparda wada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.