शिक्षणाधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:48+5:30
झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटीस
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासकीय कार्यक्रमास १५ एप्रिलपर्यत मनाईचे आदेश असतांना शनिवारी भातकुली पं.स.सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. रद्दचे आदेश असताना हा कार्यक्रम होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारा जनदरबारात मांडण्यात आले. याची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेत शिक्षणाधिकारी व अधिनस्त अधिकाºयांना २४ तासांत उपस्थित राहून स्पष्टीकरण मागितले आहे.
गर्दीचे शासकीय कार्यक्रम रद्द किंवा लांबणीवर टाकण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ११ मार्चला सर्व शासकीय विभागांना बजावले आहे. मात्र, भातकुली पंचायत समितीद्वारा आवारातील सभागृहात गट शिक्षणाधिकाऱ्यांद्वारा शनिवारी शिक्षणोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे.
शासनादेशाचे उल्लंघन केल्यामुळे या अधिकाºयांना ‘शो कॉज' नोटीस बजावण्यात आली व २४ तासांत उपस्थित राहून स्पष्टीकरण मागितले आहे.
- नितीन व्यवहारे
नोडल अधिकारी (आरडीसी)