तहसील कार्यालयात मुद्रांकांचा तुटवडा
By Admin | Updated: October 5, 2015 00:28 IST2015-10-05T00:28:38+5:302015-10-05T00:28:38+5:30
दोन तीन दिवस सुटीचे आल्यामुळे अनेक मुद्रांक विक्रत्यांना बँकेत वेळेत चालान भरणे कठीण झाले.

तहसील कार्यालयात मुद्रांकांचा तुटवडा
ग्राहकांची फरफट : नागरिकांना करावी लागतेय तारेवरची कसरत
अमरावती : दोन तीन दिवस सुटीचे आल्यामुळे अनेक मुद्रांक विक्रत्यांना बँकेत वेळेत चालान भरणे कठीण झाले. त्यामुळे ट्रेझरीतून मुद्रांक न मिळाल्याने मुद्रांक विक्रत्यांकडे गर्दी वाढली आहे. अनेकांकडे मुद्रांकाचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून मुद्रांक विक्रेत्याकडे १०० रुपये, ५०० रुपयांचे मुद्रांक घ्यावे लागल्याचे चित्र आहे.
त्याची नोंदणीदेखील नगारिकांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसील परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेता व काही ग्राहक महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचे कळते. आज पुन्हा रविवार आल्याने सोमवारी मुद्रांक विक्रेत्यांना बँकेत चालान काढावी लागणार आहे. नंतरच त्यांना ट्रेझरीतून मुद्रांक प्राप्त होणार आहे. त्यामुळे किमान मंगळवारपर्यंत तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक व शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या मुद्रांक ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. महत्त्वाची कामे करताना ५० ऐवजी १०० रुपयांचे मुद्रांक विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक व पिळवणूक व वेळेचा अपव्यय होत आहे. (प्रतिनिधी)
एका विक्रेत्याकडेच मुद्रांकाची व्यवस्था
अमरावती तहसील कार्यालयात नोंदणीकृत सात ते आठ मुद्रांक विक्रेते आहेत. परंतु बँकेत चालान न भरल्यामुळे ट्रेजरी आॅफीसरने त्यांना मुद्रांक दिले नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला फक्त एका मुद्रांक विक्रत्याकडेच मुद्रांक शिल्लक असल्याने नागरिकांनी शनिवारी गर्दी केली होती.