शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जाताहेत टॅंकर-विहिरीवर

By जितेंद्र दखने | Updated: June 17, 2023 16:55 IST

पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई

अमरावती :मेळघाटातील चिखलदरा,धारणी सह गैरआदिवासी भागातील ८८ गावात पिण्याच्या पाण्याचीटंचाई जाणवू लागली आहे. जून महिन्यातही या गावामधील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ११ गावात १४ टॅंकरने तर ७७ गावांमध्ये ८४ विंधन विहीर व खासगी विहीरव्दारे १ लाख ०९ हजार ८०२ नागरिकांची तहान भागविली जात आहे. यामध्ये १० हजार १२९ नागरिकांना १४ टॅकरव्दारे तर ७७ गावातील १ लाखावर नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक गाव आणि वाड्या वस्त्यांवर शासकीय टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात शासकीय आणि खाजगी टँकरचा समावेश आहे. ८८ गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा केला जात आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात तर चिखलदरा तालुक्यामधील १० गावात १४ टॅक़रने पाणी पुरवठा केला जात आहे. तर ११ तालुक्यातील २६ गावात विंधन विहीर तर ५८ खाजगी विहीरीव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.या गावात टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा मधील  आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार आदी ११ गावात टॅकरव्दारे तहान भागविली जात आहे.तालुकानिहाय विहिर अधिग्रहाणाचे गावे 

अमरावती ०९, नांदगाव खंडेश्वर १५,भातकुली ०१, तिवसा ०४, मोर्शी ०८, वरूड ०४, चांदूर रेल्वे १२, अचलपूर ०३, चिखलदरा १७, धारणी ०३, धामनगांव रेल्वे ०१ अशा १४ पैकी ११ तालुक्यातील ७७ गावात विहीर अधिग्रहणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील मेळघाटसह ११ तालुक्यातील जवळपास ८८गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने १४ टॅकर व ८४ विहीरचे अधिग्रहन केलेले आहे.या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा यंदा टॅकरची संख्या बरीच घटली आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती