धक्कादायक; पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 19:52 IST2022-02-25T19:52:24+5:302022-02-25T19:52:56+5:30

Amravati News आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी लोणटेक येथे घडली.

Shocking; rat powder forcefully put in wife's mouth! | धक्कादायक; पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड!

धक्कादायक; पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड!

ठळक मुद्देपत्नीचा छळ, गॅस शेगडीच्या पाईपने मारहाण

अमरावती : आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी लोणटेक येथे घडली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी राहुल हरिशकुमार शर्मा (३५, लोणटेक) याच्याविरूद्ध कलम ३०७, ४९८अ, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

             तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपीचा आंतरजातीय विवाह झाला आहे. आरोपी हा मद्यपी आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करुन शिवीगाळ व मारहाण करायचा.

२३ फेब्रुवारी रोजी आरोपी घरी आला तेव्हा तो मद्याच्या अंमलाखाली होता. त्यावर पत्नीने त्याला 'तुम्ही बाहेर गेले होते की कामाला', अशी विचारणा केली. त्यावर 'तू मला विचारणारी कोण'? असे म्हणून त्याने तिला मारहाण केली. तिला आपटले. त्यावर 'मला मारून टाका', अशी ती उद्वेगाने बोलली. तो घरात गेला. आतून उंदिर मारण्याची पुडी आणून ती त्याने पत्नीचे तोंड उघडून तिच्या तोंडात टाकली. घरात ओढत नेऊन पुन्हा मारहाण केली.

तिला खाजगी दवाखान्यातून इर्विनमध्ये हलविले. ती रात्रभर दवाखान्यात राहिली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजतादरम्यान शेजारी महिला तिला पाहण्यास गेल्या असता आरोपी राहुल शर्माने तिला पुन्हा शिवीगाळ करुन थापडा बुक्क्यांनी व गॅस शेगडीचे पाईपने पाठीवर मारहाण केली. आरोपीने आपला शारीरीक व मानसिक छळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्या महिलेने २४ फेब्रुवारी रोजी जखमी महिलेने खोलापुरी गेट पोलिसांत नोंदविली.

Web Title: Shocking; rat powder forcefully put in wife's mouth!