शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात आईने १४ वर्षीय मुलीला विकून लावले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:54 AM

पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला.

ठळक मुद्देवडिलांनी केली तक्रारप्रकरण पोहोचले ओलावा सहायता कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला. ओलावाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यानंतर सोमवारी पीडित मुलीला चाइल्ड लाइनमार्फत बालकल्याण समितीसमोर हजर करून तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.भातकुली तालुक्यातील रहिवासी १४ वर्षीय प्रणिता (काल्पनिक नाव) या मुलीचे आई-वडील सात वर्षांपूर्वी विभक्त झाले. तेव्हापासून तिची आई अकोला तर वडील भातकुली तालुक्यात राहते. तिला एक लहान बहीण आहे. प्रणिता ही आठवीत शिकते. १८ डिसेंबर २०१८ रोजी प्रणिताला आईने स्मार्ट फोन घेऊन दिला. त्यानंतर आई, आजी व मावसभाऊ प्रणिताशी मोबाईलवर संपर्क साधू लागले. १२ फेबु्रवारी २०१९ रोजी आईने प्रणिताला आजीची प्रकृती बिघडल्याचे फोनवर सांगून अकोल्यात बोलावले. ती शाळेतून बसने अकोल्यात पोहोचली. तीन दिवस ती आईसोबत राहिली. दरम्यान, आईने प्रणितासाठी विवाहाचे स्थळ पाहण्यास सुरुवात केली. तिला एक मुलगा दाखविला. त्यानंतर ११ एप्रिल रोजी आईने प्रणिताचे एका २९ वर्षीय तरुणाशी मंदिरात सांक्षगंध लावले. त्यांच्या विवाहाला गावकºयांनी विरोध केला. त्यानंतर आईने प्रणिताला तीन दिवस घरी ठेवले. सासूची प्रकृती खराब झाल्याचा बहाणाने आईने प्रणिताला त्या तरुणाच्या घरी पाठविले. तेथे प्रणिताने सासुला घरगुती कामात हातभार दिला. सांक्षगंध झालेला तरुण तिच्याशी जवळीक साधेल, अशी भीती प्रणिताच्या मनात होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यानंतर आईने प्रणिताला पुन्हा घरी आणले. दरम्यान, मुलगी घरी न परतल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. भातकुली पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील ओलावा महिला व बालकांकरिता असलेल्या सहायता कक्षाकडे दाद मागितली. ओलावा सहायता कक्षाच्या सल्लागार शालिनी काळे, समुपदेशक निकिता चव्हाण व सामाजिक कार्यकर्ता मृदुला पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य बघून मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न चालविले. ओलावा कक्षाकडून मुलीच्या आई व सांक्षगंध झालेल्या तरुणाला नोटीस बजावून १३ जून रोजी बोलावण्यात आले. त्यांनी उपस्थिती दर्शवून असे काही झाले नसल्याचे बयाण दिले. मात्र, ओलावा कक्षाच्या पदाधिकाºयांना आई व त्या तरुणाच्या बयाणावर संशय आला. त्यांनी मुलगी प्रणिताला घेऊन येण्यासंदर्भात तिच्या आईला सांगितले. १९ जून रोजी प्रणिता व तिची आई ओलावा कक्षात गेले. त्यावेळी प्रणिता आईसमोर काही बोलत नव्हती. तिला धक्का देऊन दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आईला बाहेर पाठवून तेथील पदाधिकाºयांनी प्रणिताची विचारपूस केली. त्यावेळी ती बोलली, आईने एका तरुणाशी सांक्षगंध लावल्याचे सांगितले. त्यानंतर तिने वडिलांसोबत राहायचे असल्याचे बयाण कोतवाली पोलिसांना दिले. ही बाब माहिती होताच प्रणिताच्या आईने ओलावा कक्षात प्रचंड गोंधळ घातला होता. प्रणिताला चाइल्ड लाइनमार्फत बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर प्रणिताला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.भातकुली पोलिसांची तक्रार घेण्यास नकारमला वाचवा बाबा, मला विकले, असे मुलीने फोनवर सांगितल्याचे वडिलाने तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात वडील भातकुली पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता, तेथून त्यांना पोलिसांनी हाकलून लावले, कोर्टात जा, असा सल्ला दिल्याचे वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. पीडित मुलीला विक्री करून तिचे लग्न लावण्यात येत असल्याची गंभीर घटना असतानाही भातकुली पोलिसांनी तक्रार का नोंदविली नाही, ही बाब गंभीर आहे.मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आदेशाने मुलीला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.- फाल्गून पालकर, चाइल्ड लाइन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी