शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाळेतून परतताच १३ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास

By प्रदीप भाकरे | Updated: February 28, 2023 19:10 IST

Amravati News शाळेतून परतताच एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक व समाजमन सुन्न करणारी घटना सोमवारी सायंकाळी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे घडली.

ठळक मुद्देविविध बाजूंनी चौकशी, कुटूंबिय सुन्न 

प्रदीप भाकरेअमरावती : शाळेतून परतताच एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक व समाजमन सुन्न करणारी घटना सोमवारी सायंकाळी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे घडली. आठवीत शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूने समाजमन हादरले असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्तिक प्रवीण मनोहरे (१३, शिरजगाव बंड) असे मृत मुलाचे नाव आहे.

                    शिरजगाव बंड येथील कार्तिक चांदूरबाजार येथील नगरपरिषद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तो चांदूरबाजारहून गावी परतला. शाळेचा गणवेश न काढता त्याने घरातील एका खोलीत गळफास घेतला. त्यावेळी त्याचे आईवडिल  मजुरीला गेले होते. तर आजी घराबाहेर होती. बराचवेळ होऊनही कार्तिक खोलीबाहेर आला नसल्याने आजीने आत जाऊन पाहिले असता, कार्तिक साडीने साहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यामुळे त्याच्या आजीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. आईवडिलही घरी परतले. तातडीने चांदूरबाजार ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान मंगळवारी शवविच्छेदन होऊन त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. चिमुरड्या कार्तिकचा मृतदेह पाहताच त्याचे वडील शून्यात हरविले. तर आईचा टाहो  काळीज पिळून टाकणारा होता.खाकीही झाली सुन्नघटनेची माहिती मिळताच चांदूरबाजारचे ठाणेदार अशोक जाधव, अंमलदार अजय पाथरे व दिलिप इंगळे यांनी शिरजगाव बंड गाव गाठले. तेथे घटनास्थळाचा पंचनामा करताना ग्रामस्थांसह खाकी देखील सुन्न झाली. कार्तिकच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने पोलीसही अधिक माहिती घेऊ शकले नाही. कुणाचीही मानसिकता नसल्याने खाकीला देखील मर्यादा आल्या. परिस्थिती निवळल्यावर शॉकमध्ये असलेल्या मनोहरे कुटुंबियातील सदस्यांचे बयाण नोंदविले जाणार आहे. सोबतच, त्याच्या शाळेतील वर्गशिक्षकासह मुख्याध्यापक, त्याच्या वर्गमित्रांना देखील विचारणा केली जाणार आहे.विविध बाजू तपासणारइतक्या कमी वयात एखादा मुलगा थेट गळफास लावून घेण्याच्या टोकाच्या भूमिकेपर्यंत कसा पोहोचू शकतो, असा प्रश्न तपास यंत्रणेला पडला आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम, विद्याथ्यांमधील वाद, अभ्यासाचे टेंशन या बाजु देखील तपासल्या जाणार आहेत. लोकचर्चेनुसार, शिरजगावमधील त्याच्याच एका शेजारी राहणाऱ्या मुलाने काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती, त्या घटनेचा कार्तिकच्या आत्मघाताशी संबंध आहे की कसे, हे तपासले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी अजय पाथरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी